नेहरूनगर झोन अंतर्गत ११ टिल्लू पंप जप्त

नागपूर, ता. १९ : उन्हाळ्यातील पाणी टंचाई व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध पंप जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी (ता. १९) नेहरूनगर झोन अंतर्गत नंदनवन झोपडपट्टी गल्ली क्र. १, २ व ३ या भागातील ११ टिल्लू पंप जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी टिल्लू पंप जप्तीचे आदेश विभागाला दिले आहे. त्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

          उन्हाळ्याच्या दिवसात अनेक नागरिक अवैधरित्या नळाला टिल्लू पंप लावून पाण्याची चोरी करीत असतात. यावर आळा घालण्यासाठी मनपाद्वारे टिल्लू पंप जप्तीची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सदर कारवाई सकाळी ८ वाजता नेहरूनगर झोनच्या पथकाद्वारे करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'अग्निशमन सेवा सप्ताह'निमित्त विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रम

Tue Apr 19 , 2022
नागपूर, ता. १९ : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिल दरम्यान ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ पाळण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये अग्निशमन विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंगळवारी (ता. १९) मनपाच्या सर्व अग्निशमन केंद्रातर्फे शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. सोबतच आगीपासून निर्माण होणारे धोखे टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व उपाययोजना बाबत जनजागृती व अग्निशमन यंत्रणेची माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com