बांधकाम मलबा संकलनाचे कार्य मनपातर्फे सुरू

नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात दररोज निर्माण होणारा कचरा आणि बांधकाम तोडीचा कचरा अर्थात मलबा गोळा करण्याचे काम नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनमध्ये पडून असलेल्या बांधकाम मलब्याची (सी अँड डी वेस्ट) माहिती संकलित करण्यात आली असून ते झोननिहाय पथकाद्वारे उचलण्यात येणार आहे.शहरातील बांधकाम मलबा उचलून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मलबा संकलित असलेल्या भागांचा शोध घेउन ती माहिती उपद्रव शोध पथकाद्वारे संकलित करण्यात आली. प्रभागनिहाय पडून असलेला मलबा ‘सी अँड डी वेस्ट’ एजन्सीच्या मदतीने झोनमधील उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून उचलण्यात येणार आहे.उपद्रव शोध पथकाने संकलित केलेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर झोनमध्ये २६ ठिकाणी, धरमपेठ झोनमध्ये ५४ ठिकाणी, हनुमान नगर झोनमध्ये १६ ठिकाणी, धंतोली झोनमध्ये २१ ठिकाणी, नेहरू नगर झोनमध्ये २९ ठिकाणी, गांधीबाग झोनमधील २२ ठिकाणी, सतरंजीपुरा झोनमधील १३ ठिकाणी, लकडगंज झोनमध्ये ११ ठिकाणी, आशीनगर झोनमधील ३० ठिकाणी आणि मंगळवारी झोनमधील २७ ठिकाणी बांधकाम मलबा अर्थात सी अँड डी वेस्ट आढळून आलेला आहे. याशिवाय शहरात शासकीय संस्थांमार्फत सुरू असलेल्या विकास कामांच्या स्थळी निर्माण होणारा मलबा देखील पथकामार्फत उचलण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रदेश कार्यालयात मीडिया सेंटर

Sat Mar 30 , 2024
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश माध्यम विभागाच्या मीडिया सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते गणेश हाके,ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. या सेंटरच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक काळात पत्रकारांना आवश्यक माहिती दिली जाणार आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com