संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जिवन रक्षक दल च्या स्वयम् सेवकांची उल्लेखनीय कामगिरी
पारशीवणी :- पारशीवणी तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साहोली कन्हानदी पुलियावर दामपत्याचा तोल जाऊन २८ आगस्ट २०२४ च्या सकाळी वॉकिंग करताना दोन्ही दाम्पत्याचा तोल जाऊन नदीत कोसळले होते. पत्नीला वाचविताना यश आले. मात्र पतीचा शोध घेण्याची मोहीम जिवन रक्षक दल घेत होते. अखेर ३० आगस्ट ला बिना (संगम) परिसरात जिवन रक्षक दल च्या स्वयम् सेवकांना प्रशांत पाटोळे यांचे शव आढलून आले. याची माहिती खापरखेडा पोलीस स्टेशन विभागाला देण्यात आली. पोलीस विभागाने पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
पारशीवणी तालुक्यातील साहोली येथील जिवन रक्षक दल नेहमीच चर्चेत आहे. कन्हान नदी जवळच असल्याने नेहमीच लहान मोठया घटना घडत असतात. अशावेळी जिवन रक्षक दल शाखा साहोली शाखा अध्यक्ष किरण बावणे व त्यांचे सहकारी पोलीस विभाग तसेच तहसिल विभागाला नेहमीच मदत करीत असतात.हे सर्वत्र नागरीकांना माहिती आहे.
अशीच एक घटना २८ आगस्ट २०२४ च्या सकाळी फिरायला गेलेले दामपत्य त्यात पतीला भोवळ आली अन् तो कन्हान नदीत पडला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या पत्नीने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली, पण तोपर्यंत त्याला जलसमाधी मिळाली होती. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी खापरखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली. लगेच पोलिसांनी जिवन रक्षक दल शाखा साहोली ला पाचारण करण्यात आले. जिवन रक्षक दल त्यात किरण बावणे, प्रमोद खेडेकर, अतुल मेश्राम, रवी मारबते, महेश बावणे लगेच कन्हान नदी येथे पोहचून कन्हान नदीत उडी घेत महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र त्याच्या पतीचा नदीला जास्त पाणी असल्याने थांग पता लागला नाही व शोध मोहीम सुरूच होती.
हा भयावह प्रकार खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानेगाव परिसरात घडला. प्रशांत शेषराव पाटोळे असे मृत पतीचे नाव आहे. तर संध्या प्रशांत पाटोळे असे जीवदान मिळालेल्या पत्नीचे नाव आहे. पाटोळे हे दाम्पत्य नेहमी सकाळी फिरायला जात होते. प्रशांत पाटोळे हा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.
त्याने नवीन बिना भानेगावात घराचे बांधकाम केले. यामुळे तो कर्जाच्या विळख्यात अडकला होता. मात्र दोघेही दाम्पत्य सकाळी नेहमी फिरायला जात होते. त्यांनी फिरून झाल्यावर साहोली येथील कन्हान नदी पुलियावर बसले होते. यातच पतीचा तोल नदीत गेल्याने त्यांना वाचविण्यासाठी पत्नी ने त्यांचा हात पकडताच तिचाही तोल गेल्याने दोघेही कन्हान नदीत पुलीयावरून पडले.
यात जिवन रक्षक दल शाखा साहोली च्या स्वयम् सेवकांनी महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले व तिसऱ्या दिवशी ३० आगस्ट ला पतीचे प्रेत शोधण्यात यश आले.भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष एड. दादासाहेब वलथरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर, महासचिव व जिवन रक्षक दल महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम, अशोक भोयर, जिल्हाध्यक्ष अंबादास भोयर यांनी साहोली शाखा , बिना ( संगम) शाखेचे अभिनंदन केले.