लाडकी बहीण योजनेचा लाभ बहुतांश महिलांना देण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करण्याची गरज – ॲड. सुलेखा कुंभारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली सुचना

 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- कामठी येथील तहसील कार्यालयात पूरग्रस्त लोकांच्या समस्या ऐकुण घेण्याकरिता माजी ऊर्जा मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार टेकचंद सावरकर व अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. जवळपास दीढ ते दोन तास या भेटी दरम्यान अनेक राजकीय, विकास कामे व शासकीय योजनांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

या वेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ बहुतांश महिलांना मिळावा या दृष्टिकोणातुन प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करण्याची गरज असल्याचे मत ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले. तसेच ड्रॅगन पॅलेस ला पोहचण्याकरिता रमा नगर मार्गावर असलेल्या रेल्वे ओवर ब्रिजचे काम त्वरित पूर्ण करावे जेणेकरून धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस ला भेट देणा-यांकरिता मार्ग उपलब्ध होईल.

कामठी शहराच्या मध्यभागी असलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध करावी अशी विनंती सुध्दा ॲड. सुलेखा कुंभारे यांनी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबती चर्चे दरम्यान केली…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमी परिसरातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा उपसा करावा - भदंत ससाई यांनी गुरुवारी केली पाहणी

Fri Jul 26 , 2024
– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करावी, अशा आशयाचे पत्र परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com