नवरात्री विशेष हातमाग प्रदर्शनाचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा – गाडीलकर

– गोंडवाना गॅलरीत सोमवारपर्यंत आयोजन

नागपूर :- नवरात्री सणाच्या शुभारंभप्रसंगी 15 व 16 ऑक्टोबरला राज्य हातमाग महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हातमाग प्रदर्शनाचा लाभ नागपूरकरांनी घ्यावा. मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे नवरात्री निमित्त गोंडवाना गॅलरी, रामदासपेठ नागपूर येथे 15 ऑक्टोबर 2023 रोजी राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मीना मनोज सूर्यवंशी, शालिनी इटनकर तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या प्रदर्शनीचे आयोजन नवरात्रीनिमित्त विशेष महिलांसाठी हा मुख्य हेतू असल्याचे राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर म्हणाले. खादी वस्त्रोद्योग हा देशातील महत्वाचा उद्योग असून पर्यावरणपूरक आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे, हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही प्रदर्शनी ग्राहकांसाठी निशुल्क प्रवेश असून या प्रदर्शनीमध्ये खादीच्या कापडापासून तयार केलेल्या साडया, चादरी, कुर्ती तसेच विविध प्रकारचे खादीचे कापड विक्रीसाठी ठेवल्या आहेत, नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देऊन वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Mon Oct 16 , 2023
नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त चंद्रभान पराते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, कमलकिशोर फुटाणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!