परस्पर समन्वयातून आदर्श आचारसंहितेत निवडणुका पार पाडण्यासाठी कटीबद्ध व्हा! – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर

▪️ निवडणूक अंमलबजावणी यंत्रणातील वरीष्‍ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

नागपूर :- येणारी लोकसभा निवडणूक ही आदर्श आचारसंहितेत पार पाडावी यासाठी अंमलबजावणी यंत्रणातील सर्व संबधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणुकीची कार्यपद्धती, नियमावली व इतर वेळोवेळी निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा विचार करुन निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत प्रशिक्षणही पार पाडली जात आहेत. नियमांचा काटेकोर वापर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन निवडणुकींच्या कामासाठी कटीबद्ध होण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले.

आगामी सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील एकूण 22 पेक्षा जास्त अंमलबजावणी यंत्रणेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर व संबधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सीव्हीजील ॲप व ई-एसएमएस (इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम) याबाबत बैठकीत प्रशिक्षण देण्यात आले.

नागपूर जिल्ह्याला तेलंगणा व मध्यप्रदेशची लागून असलेली सीमा लक्षात घेता निवडणुकांमध्ये काही गैरप्रकार होणार नाही यासाठी संबधित मंडळ अधिकारी व पोलीस विभागाने अधिक खबरदारी घेतली पाहिजे. बँकामधून होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत दक्षता घेण्याच्यादृष्टीने बँकांना निर्देश देऊन त्याबाबतचा आढावा महत्वाचा आहे. राष्ट्रीय व सहकारी बँकांच्या कॅश व्हॅन यांना क्यूआर कोड लावणे बंधनकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या. आवश्यकता भासेल तशी आयकर विभाग व इतर खर्चाच्यादृष्टीने निघराणी ठेवण्यासाठी पोलीस विभाग वेळोवेळी पाठबळ देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कॅफो विलीन खडसे व वेतन पडताळणी अधिकारी शैलेश कोठे यांनी प्रशिक्षण दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रस्ते अपघातात बळी पडणारे जीव वाचू शकतात हा विश्वास दृढ होणे आवश्यक - निवृत्त न्या.अभय सप्रे

Fri Feb 23 , 2024
▪️ मानवी चुकांमुळेच अपघातात बळींची संख्या जास्त  ▪️ जनजागृती आणि कार्यान्वयन यंत्रणेची भूमिका मोलाची ▪️ जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा घेतला आढावा नागपूर :- रस्ते अपघातात होणारी जीवितहानी ही मानवी चुकांचे द्योतक आहे. फार कमी अपघात हे वाहनातील अचानक उदभवणारे तांत्रिक बिघाड अथवा इतर कारणांमुळे होतात. रस्ते अपघातात बळी पडणारे जीव हे सर्वांच्या दक्षतेतून वाचवले जाऊ शकतात हा विश्वास अधिक दृढ होणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com