यवतमाळ :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळच्यावतीने सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिर तालुक्यातील चिचबर्डी येथे पार पडले. शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.वि.पी.माने व उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पार्लावर तसेच सरपंच नंदकिशोर कुमरे, पोलिस पाटील विजेंद्र टेकाम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता चानेकर, महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री उघाडे उपस्थित होत्या.
शिबिरामध्ये महिला बालसंगोपन, मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. उद्योजकता मार्गदर्शन, कौशल्य विकास, अन्न प्रक्रिया आधारित शासकीय योजना, अन्नप्रक्रिया रोजगार योजना, मूल्यवर्धित विविध पदार्थ निर्मिती, अन्न व औषध प्रशासन विभागातील रोजगाराची संधी, नवउद्योजक निर्मिती व इतर विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्वच्छता, योगाभ्यास, वृक्षारोपण, श्रमदान व वनराई बंधारा इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
शिबिरादरम्यान अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी गोपाल माहोरे, एमसीईडीचे रुपेश हिरुळकर, जिल्हा कौशल्य विकासचे योगेश काकडे, आनंद भुसारी इत्यादी तज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमास अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.वि.पी.माने, कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री उघाडे, रासेयो व एमआयडीसी असोसिएशनचे सचिव आनंद भुसारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. निखिल सोळंके, डॉ. विकास पाटील, डॉ. प्रदीप थोरात, डॉ.जगदीश सांगळे, विजय नाकाडे, कृष्णा सवळे व इतर कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व सर्व गावकरी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.