– विदर्भा मधले पहिले पेपरलेस व डिजिटल हॉस्पिटल
– ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करता वृक्षसंवर्धनासाठी पाऊल, प्रेस्को ॲप ठरतेय उपयुक्त
नागपूर :- आपण वापरत असलेला कागद हा वृक्ष तोडून बनविला जातो आणि याच कागदाचा वापर कमी केला तर अनेक वृक्षांना तोडण्यापासून वाचविले जाऊ शकते हे ध्येय ठेऊन नागपूरचे प्रख्यात न्यूरो तज्ज्ञ डॉ. समीर पालतेवार यांनी त्यांचे हॉस्पिटल पूर्णपणे पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेऊन तो अमलात आणणारे डॉ. समीर पलटवार, अर्पण पांडे व अमृता शर्मा टीम यांचे मेडिटेरीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे नागपूर मधले पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
याकरीता प्रेस्को ॲप उपयुक्त ठरले असून हा मुंबईमधील तीन युवकांनी एकत्र येऊन तयार केलेला अँड्रॉइड अप्स यशस्वी वापर गेल्या तीन वर्षापासून भारतामध्ये 600 हून अधिक हॉस्पिटल करत आहेत. याचमुळे सुमारे ७.५ कोटी कागदांची एका वर्षात बचत होऊन 20 दशलक्ष अधिक झाडे वाचली. या टॅबवरील ॲपचा वापर सुलभ आहे. टॅबसोबत येणा-या विशिष्ट पेनाने त्यावर लिहिता येते. जे विविध प्रकारचे रकाने एका रुग्णांसाठी डॉक्टर व नर्सेसला भरावे लागतात. ते सर्व पेनद्वारे टॅबमध्ये लिहिता येतात त्यामुळे हे वापरण्यास खूप सोपे असून कागदावर लिहायची तसेच प्रिंट काढण्याची गरज नाही.
पेपरलेसच्या वैशिष्ट्यांवर एक दृष्टिक्षेप
७५ ते १०० कागद लागतात एका रुगासाठी एका झाडापासून २० हजार कागदांची पाने बनतात भारतामध्ये ६०० हून अधिक हॉस्पिटल सध्या पेपरलेस. याचमुळे सुमारे ७.५ कोटी कागदांची एका वर्षात बचत होऊन २० दशलक्ष अधिक झाडे वाचली. हॉस्पिटलमधील कागद किंवा फाईलद्वारे रूग्णांना होऊ शकणारा जंतुसंसर्ग टाळला जाऊ शकतो.
डॉ समीर पालतेवार मेडिटेरीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस:
नागपूर मधील संख्या लक्षात घेतल्यास चिंता:
एक रुग्ण दाखल झाल्यापासून त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत ७५ ते १०० कागद त्याच्यासाठी लागतात. उपचार, त्याचे निरीक्षणे, त्याचे रिपोर्ट्स, आदींचा समावेश असतो. एका झाडापासून २० हजार कागदांची पाने बनतात. जर नागपूरमधील सर्व हॉस्पिटलचा एकत्रित विचार केला तर किती कागदाचा वापर दरवर्षी होतो आणि पर्यायाने यासाठी किती वृक्षतोड करावी लागते ही संख्या चिंताजनक आहे.