नागपूर :- महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ०७ केसेस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून १३,८२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व जुगार कायदा अन्वये ०५ केस मध्ये ०९ इसमावर कारवाई करून २७,३४५ स चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३,६२२ वाहन चालकांवर कारवाई केली. एकूण रू. २५९,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.