संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आझाद नगर येथील कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यानी घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातल्या आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 25 हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण 33 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी कपडा व्यापारी शेख सलाम शेख युसूफ ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.