नागपूर येथे 27 मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’

  30 विमानांचे आकाशातून पथ संचलन होणार

  20 एनसीसी कॅडेटस् करतील घोडसवारी

  विशेष कामगिरी करणाऱ्या एन.सी.सी. कॅडेटस् चा सत्कार

  पाच हजारावर विद्यार्थी ‘ऐरोमॉडेलिंग शो’ चा आनंद घेणार

नागपूर, दि. 24 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘ऐरोमॉडेलिंग शो’च्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्मितीला चालना मिळणार असून हा शो सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी या शोमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनाच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 30 विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात भरती होण्याची महत्वाकांक्षा निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळालेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही होणार आहे.

लहान मुलांच्या विश्वात हक्काचे स्थान निर्माण केलेले विमान म्हणजे कायमच उत्सुकतेचा विषय आहे. विमान कसे बनते, इथपासून तर ते कसे उडतेपर्यंतच्या सर्वच गोष्टी चिमुकल्यांसह मोठमोठयांना भुरळ घालत असतात. विमानाचा शोध कुणी लावला असे विचारल्यावर राईट बंधू असे नाव आपल्या तोंडावर सहजपणे येते. पण, राईट बंधूच्या संशोधनापूर्वी अस्तित्वात आलेल्या एरोमॉडेलिंगला अद्याप गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. जनतेनी एरोमॉडेलिंग काय आहे. हे समजून घ्यावे, त्याबद्दलची उत्सुकता वाढावी, या उद्देशाने हा शो आयोजित करण्यात येणार आहे.

‘ऐरोमॉडेलिंग शो’ मध्ये विविध साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्स रायडींग, सांस्कृतिक कार्यक्रम, एनसीसी चे विविध अत्याधुनिक यंत्र, शस्त्रात्रांची माहितीवर्धक प्रदर्शनी तसेच ॲथलेटिक्स स्टेडीयम पॅव्हेलियन इमारतीचे लोकार्पण व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच एरोमॉडेल्स, वायुसेना, नौदलांचे अत्याधुनिक यंत्रे, शस्त्रात्रे, सेवा तसेच एन.सी.सी. आदी संदर्भात यामध्ये माहिती दिल्या जाणार आहे.

नागपूर शहरातील विविध शाळांमधून सुमारे पाच हजार विद्यार्थी तर गणमान्य व्यक्ती, मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पालक, नागरिक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असे सुमारे दोन हजार व्यक्ती तसेच या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी एनसीसीचे अधिकारी व छात्र या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी आवाहन

Thu Mar 24 , 2022
नागपूर, दि. 24 : खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” चा शासन निर्णय घेण्यात आला आहे.             ज्या उमेदवारांनी क्रीडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com