संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-बांधकामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर होणार कार्यवाही
कामठी ता प्र 2 ऑगस्ट :- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून तत्कालीन पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बवाबकुळे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून कामठी तालुक्यातील गादा गावाजवळच्या प्रशस्त जागेवर जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी 29 मार्च 2016 ला 26 करोड रूपयाच्या मंजूर निधीतून कामठी तालुक्यातील शहरापासून 10 की मी दूर अंतरावरील गादा गावाच्या मार्गावर 21 एकर जागेत 8 कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाचे काम उभारण्यात आले असून हे काम तीन वर्षात पूर्ण करून देणे होते आजच्या स्थितीत बांधकामाला सुरू होऊन पंचवार्षिक कार्यकाळ लोटन्याच्या मार्गावर आहे मात्र काम कासवगतिने सुरू असल्याने क्रीडा संकुला अभावी तालुक्यातील खेळाडूंची उपेक्षा होत आहे तर तालुक्यातील राज्य पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची सरावासाठी परवड होत असल्याने तालुक्यातील क्रीडा प्रेमी मध्ये घोर निराशा दिसून येत आहे. तेव्हा हे अर्धवट बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास यावे यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांनी आज जिल्हा क्रीडा संकुलाच्या अर्धवट बांधकामाची पाहणी करून बांधकाम संदर्भात तीव्र नाराजगी व्यक्त केला यासंदर्भात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या कार्यालयात विशेष बैठक घेऊन येत्या तीन महिन्यात क्रीडा संकुलाचे अर्धवट बांधकाम पूर्णत्वास आणण्याचे निर्देश दिले तर बांधकामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही कार्यवाही करणार असल्याचा ईशारा दिला. याप्रसंगी तहसीलदार अक्षय पोयाम, कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आरिफ शेख, डीएसओ पल्लवी धात्रक,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, भाजपा ग्रा अध्यक्ष किशोर बेले, क्रीडा समिती सदस्य राजेश देशमुख , लाला खंडेलवाल, कपिल गायधने, प्रतीक पडोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कामठी शहरातील क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास येथे क्रिकेट चे नामवंत खेळाडूं सी के नायडू यांचे जन्मस्थान आहे .येथील छावणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रब्वानी मैदानावर प्रशिक्षण पूर्ण करून विदेशात फुटबॉल मध्ये नावलौकिक मिळवनारा स्व.मुसताक पठाण यांनी सुद्धा कामठी शहराचे नावलौकिक केले तसेच काही काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत कामठीतील न्यू ग्लोबल क्लब च्या खेळाडूंनी जोरदार विजय प्राप्त केला होता या संघाचे प्रशिक्षक कोच कामठी चे श्यामलाल घोष यांच्यासारख्या महत्वपूर्ण खेळाडूंनी या शहरात राहून जीवणातील क्रीडा क्षेत्रात विजय प्राप्त केला आहे
कामठी तालुक्यात पूर्वी कबड्डी, खो खो तसेच कुस्ती , मल्लखंबासारखे खेळ खेळले जात होते या खेळासाठी मराठा लोन्सर्स, प्रगतिमंडळ, सेव्हन स्टार क्लब, नागसेन क्लब,सुभाष मंडळ, , हरदास मंडळ आदी नावांनी मोठमोठ्या कबड्डीचे क्लब असायचे तालुक्यातील रुईगंज मैदान ,नागसेन नगर, हाकी बिल्डिंग समोर मैदान आदी ठिकाणी स्पर्धा होत होते, फुटबॉल स्पर्धा होत होत्या.मात्र आज या तालुक्यात क्रीडा संकुला अभावी खेळाडूंची निराशा होत आहे तर आज इतके वर्षे लोटून गेले मात्र क्रीडा संकुल निर्माण करण्यास अपयश येत असल्याने खेळाडूंची मात्र कुचंबणा होत असून हा प्रकार तालुक्यातील खेळाडूंच्या भविष्याशी खेळ खेळणारा ठरत आहे.