राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून त्वरित बरखास्त करण्याच्या मागणीसाठी भाजपचे तहसीलदारांना सामूहिक निवेदन

– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 24:, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्री प्रकरणात सक्तवसुली संचालनालय( ईडी) ने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली असून तीन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे अश्या अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्राला राज्य मंत्रिमंडळातून त्वरित बरखास्त करण्याच्या मागणीसाठी कामठी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामठी तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने करीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने तहसीलदार अक्षय पोयाम यांना निवेदन देऊन कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना त्वरित बरखास्त करण्याची मागणी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्याशी संबंधित म्हणीलॉन्ड्री प्रकरणात सक्तवसुली (ईडी)न्यायालयाने बुधवारला राज्यातील महाआघाडी सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक करून तीन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली असल्याने त्यांना राज्य मंत्रिमंडळातून त्वरित बरखास्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे नवाब मलिक देशद्रोही असून अशा गद्दार देशद्रोही मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणे हे म् हाआघाडी सरकारला लज्जास्पद असून त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून हकालपट्टी न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने रास्तारोको करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तहसीलदार अक्षय पोयाम यांना निवेदन देतेवेळी अनिल निधान ,कामठी तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत ,कामठी शहर भाजपाध्यक्ष संजय कनोजिया, कामठी तालुका महिला भाजप आघाडी अध्यक्षा मंगला कारेमोरे ,डॉ संदीप कश्यप ,उज्वल रायबोले, राजेश देशमुख ,माजी सरपंच मनिष कारेमोरे , नगरसेवक लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, विनोद वाट, पिंकी वैद्य ,संध्या रायबोले, प्रमोद वर्णम, सरिता भोयर, सुषमा राकडे, मुक्ता कारेमोरे ,धनंजय इंगोले, कविता बावनकर, वंदना भस्मे, दीपक नेटी ,योगेश वाडीभस्मे ,राजा यादव, रवी तामसेटवार ,आशुतोष अवस्थी ,पंकज वर्मा, सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैध वाळू वाहतुकदारावर महसूल प्रशासनाची कारवाही

Fri Feb 25 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यातील परसोडी मार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एम एच 40 एन 6035 ट्रक वर रात्रगस्त वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी रित्या धाड घालण्याची कारवाही गतरात्री 9 दरम्यान केली असून या धाडीतून ट्रक सह अवैध 2 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व मौदा पोलीस स्टेशन ला हलविण्यात आले. ही यशस्वी कारवाही तहसीलदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights