खूनाचा गुन्हा उघडकीस आरोपीस अटक

नागपूर :-दिनांक ०२.०८.२०२३ चे १९.०० वा. पूर्वी पो. ठाणे एम.आय.डी.सी. हददीत निलडोह ग्रामपंचायत हददीत एम.आय.डी.सी. से १८ इंडस्ट्रीयल एरीया, या प्लॉट चया मोकळ्या जागेत कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून एक अनोळखी महीला वय अ. ३५ वर्षे हिचे चेहरयावर डोक्यावर, उजवे हातावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून, तिला जिवानिशी ठार केले. याप्रकरणी पो. ठाणे एम.आय.डी.सी. येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयात अज्ञात आरोपीने महिलेच्या डोक्यावर चेहऱ्यावर कोयत्या सारखा धारदार शस्त्राने वार करन निर्घुण हत्या केली होती. मृतक महीलेचे उजवे हातावर “सिध्दार्थ ” असे गोंदलेले होते. आरोपीने चेहऱ्यावर वार केले. असल्याने मृतक महीलेची ओळख पटविणे शक्य होत नव्हते. घटनास्थळाच्या काही अंतरावर झाडी झुडपात एक कपडयाची बॅग मिळून आली. सदर बॅगमध्ये कपडे मिळुन आल्याने व एका पॅन्टवर “फेन्ड्स टेलर” लाखनी असे टेलर मार्क मिळुन आल्याने तात्काळ लाखनी येथील संबंधीत टेलरचा शोध घेउन त्याचेकडुन सिध्दार्थ नावाचे इसमाबाबत विचारपुस केली असता त्याने बोरगांव, लोखोरी, तहसिल लाखणी जि.भंडारा येथील सिध्दार्थ मेश्राम याची पेंट शिवल्याचे सांगितले. पोलीसांनी गावामध्ये जावून विचारपुस केली असता सदर इसमाची पत्नी ही नागपूर येथील कार्तिक नगर येथील असल्याचे व तिचे नांव शिल्पा सिध्दार्थ मेश्राम वय ३३ असल्याचे समजले. सिध्दार्थ मेश्राम हा कालपासून गावात नसल्याची माहीती मिळाली. पोलीसांनी लाखणी येथील पोलीसांचे मदतीने सिध्दार्थ मेश्राम याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने खूनाचे गुन्हयाची कबुली दिली. आरोपी सिध्दार्थ भगवान मेश्राम वय ३५ वर्ष रा. बोरगाव, पोस्ट लाखोरी, ता. लाखनी जि. भंडारा यास पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे आणुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.

गुन्हयाचे प्राथमीक तपासामध्ये असे दिसून आले की, सन २०१५ मध्ये शिल्पा हिचा पहिला पती सुनिल उमरे अपघातामध्ये मरण पावला होता. शिल्पा व सिध्दार्थ मेश्राम हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. शिल्पा हिस पहील्या पती पासून ८ वर्षांची मुलगी आहे. दोघांमध्ये पैश्याचे कारणावरून सतत वाद होत असल्याने मागील दिड महीन्या पूर्वी शिल्पा ही सिध्दार्थं मेश्राम याला सोडुन नागपुर येथे आपले वडील नामे अशोक हर्षे राहणार कातक नगर नागपुर येथे राहण्यास आली होती. शिल्पा ही सिध्दार्थ यांचेकडे घर खर्चाकरीता पैश्याची मागणी करत होती. पैस न दिल्यास मुलीला भेटू देत नव्हती. त्यामुळे रागावलेल्या सिध्दार्थ मेश्राम याने दि. ०२.०८.२०१३ रोजी आपल्या घरून कोयता सोबत आणुन शिल्पा हिला भेटण्यासाठी घटनास्थळी बोलावुन वर नमुद्र कारणावरून शिल्पा हिचे डोक्यावर,  तसेच हातावर कोयत्याने वार करून जिवानिशी ठार मारल्याचे सांगीतले…

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त , परीमंडळ – १ मा. सहा. पोलीस आयुक्त, एम.आय.डी.सी विभाग. भिमा नरके वपोनी,  मुकूद कवाडे, पो.नि. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत सावळे, योगेश मोहिते, पोहवात्र अरविंद दिये, नापोअ दिपक सराठे, स्माईल नौरंगाबादे, जितेन्द्र खरपूरीया, सुनिल बैस व निलेश दुबे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातर्फे विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार डेंग्यु जनजागृती, देण्यात येणार स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड

Fri Aug 4 , 2023
चंद्रपूर :- राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु प्रतिरोध मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले जाणार असुन याद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय विद्यार्थी व पर्यायाने सर्व घरी कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती केली जाणार असल्याची माहीती आयुक्त विपीन पालीवाल यांनी आढावा बैठकीत दिली. मनपा क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची डेंग्यु जनजागृती संबंधी बैठक मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com