चंद्रपुर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे शासकीय कर्तव्यावर असताना कु. स्वाती ताई ढूमने व वनमजुर यांचेवर माया नामक वाघिनिने अचानक हल्ला केला त्यात दुर्दैवाने स्वाती ताई ढूमने यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वणपाल संघटना नागपूर यांचे वतीने वन शहीद स्वर्गवासी स्वाती ताई ढूमने यांना आज दिनांक 21/11/ 21 रोजी जपानी गार्डन सेमिनरी हिल्स, नागपूर येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांचे वतीने संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांनी वन शहीद स्वाती ताई ढूमने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.
प्रसंगी वनरक्षक, वनपाल, वनमजूर व इतर वन कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी संघटनेच्या वतीने श्री. अजय भाऊ पाटील यांनी तात्काळ व्याघ्र गणनेची कामे थांबवणे तसेच जोपर्यंत एका वनरक्षक सोबत कमीत कमी 5 वनमजूर यांचा गट सोबत दिल्याशिवाय सदर कामे सुरू करू नये त्याच प्रमाणे वन शहीद स्वाती ताई ढूमने यांच्या पश्चात त्यांच्या पतीला तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेणे आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांच्या नावे प्रत्येकी 50 लाख रुपये फिक्स डीपॉझिट करून ते जेंव्हा 21 वर्षाचे होतील तेंव्हा त्या रकमेचा फायदा त्यांना झाला पाहिजे आणि तोवर त्या रकमेच्या व्याजावर त्यांचे शिक्षण होईल अशी व्यवस्था शासनाने करावी, इत्यादी मागण्या संघटनेच्या वतीने श्री. अजय पाटील यांनी केल्या.