गवळी समाज संघटना नागपूर तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर तर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाल येथे आयोजन करण्यात आले होते. दही हंडी भजन व्दारे सुरुवात झाली, भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी हिरामण गवळी अध्यक्षस्थानी होते. अशोक भाले, बाबासाहेब गलाट, निवृत्त विक्रीकर आयुक्त सोमनाथ नडंगे, निवृत्त अति.पो.महासंचालक टिकाराम भाल, मंगला खेकरे, मन्नुभाई हिरणवार, आनंदराव कालोकर, रामजी मोरे आदीचा सहभाग होता.बाबासाहेब गलाट यांना हंसराज अहिर व अन्य मान्यवरांच्या हस्ते म.ग.स.सं. नागपूर च्यावतीने गवळी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गवळी समाजातील सेवा निवृत्त अधिकारी, सरपंच, सभापती, जि.स, पं.स.सदस्य, कृ.उ.बा.स.संचालक, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. गवळी समाजातील १०/१२ वी तील गुणवत्ता प्राप्त ५२ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तसेच भावना वैद्यची एमपीएससी च्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी भज.ब मधून राज्यात पहिली आल्याने आणि समीर देशमुखने तिसऱ्या राज्यस्तरीय स्यांबो कुस्ती स्पर्धेत सुर्णपदक मिळवल्याने संघटने कडून सत्कार करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धा, घेण्यात आल्यात व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली. हंसराज अहीर यांनी आपल्या संबोधनातून भगवद्गीतेचा उल्लेख केला. युगप्रवर्तक भगवान श्रीकृष्णाच्या कुळात आपला जन्म झाला हे आपले परमभाग्य असल्याचे ते म्हणाले. समस्त गवळी बांधवांनी याचा सार्थ अभीमान बाळगावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समस्त गवळी समाज एकजूट व्हावा. जन्माष्टमीचा कार्यक्रम आयोजित करावा ही अतिशय आनंदाची बाब असून, नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल स्तूती केली म.ग.स.सं नागपूर वार्षिक अंकाचे यावेळी हंसराज अहिर यांनी विमोचन केले. हा अंक शैलेश हातबुडे यांनी संपादित केला. सोबतच त्यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करत वर्षभरातील केलेल्या कार्याची माहिती दिली. जगन्नाथ गराट यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. संचालन चंद्रकात मोरे, शैलेश हातबुडे व कोमल अवथळे यांनी केले तर आभार प्रभाकर देशमुख यांनी मानले. सेवकराम भट, शंकर साठे, प्रशांत हातबुडे, रमेश पोहनकर,परसराम भड यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेत.

NewsToday24x7

Next Post

संकट मोचक नितीन गडकरी, खरगोनच्या पुरातून नागपूरकरांना वाचवले

Mon Sep 18 , 2023
नागपूर :- गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात आणि पुरात अडकलेल्या नागपूरचे सिनियर डॉक्टर आणि ४ स्वामींचा बचाव करण्यासाठी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी ह्यांनी तातडीने मदत पोचवली. तत्काळ बचाव पथक पोचल्याने नागपूरकर काल मध्यरात्री सुखरूप सुरक्षित स्थळी पोचते झाले . विवेका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले नागपुरातील सुपरिचित न्युरोसर्जन डॉ. ध्रुव बत्रा ह्यांचे वडील ६७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक आणि सिनियर डॉक्टर […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com