– स्वच्छ शौचालय मोहीमेला उत्तम प्रतिसाद
नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका कार्यतत्पर आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने (mohua) जागतिक शौचालय दिन 2023 चे औचित्य साधून येत्या 25 डिसेंबर पर्यंत देशव्यापी “स्वच्छ शौचालय मोहीम” राबविण्याचे ठरविले असून, नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तसा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. मनपा हद्दीतील सामुदायिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालयांची नियमित रित्या स्वच्छता केल्या जात आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत महत्वाची असून, स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांचे परिचालन प्रभावी करण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत भविष्यासाठी, सर्व सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी हा 5 आठवड्यांचा उपक्रम राबवला जात आहे. कार्यात्मक, प्रवेश योग्य, स्वच्छ, इको-फ्रेंडली, आणि सुरक्षित या पाच मानकांवर आणि सुरक्षित स्वच्छतेसाठी वेगवान बदल या संकल्पनेवर स्वच्छ शौचालये चॅलेंज (आव्हान) सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत मनपाने सक्रीय सहभाग नोंदविला असून, नागपूर शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृह यांच्या स्वच्छतेवर भर दिले जात आहे.
वर्ष 2014 मध्ये सुरू झाल्यापासून, स्वच्छ भारत मिशनने जागतिक स्तरावर स्वच्छता पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये स्वच्छता, यांत्रिक मैला व्यवस्थापन आणि युडब्ल्यूएम ला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करून, स्वच्छ भारत मिशन- शहरी 2.0 ने प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेष, प्रशासन, तसेच लहान शहरांनी संरचना आणि अंमलबजावणीमध्ये चक्राकार अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली आहे. नागरिकांनी देखील स्वच्छ सुंदर स्वच्छ नागपूर साकारण्यास पुढाकार घेत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.