नागपूर :- पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने अवैध रेतीच्या साठयावर कारवाई करून पोस्टे पारशिवनी हद्दीत तामसवाडी शिवारात लांभा ब्रिक जवळ तसेच गोपाल मेहाडीया यांचे ब्रिक्स जवळ खुल्या जागेत रेड टाकुन अवैध रेतीच्या साठयावर कारवाई करून एकुण ११५ ब्रास रेतीचा साठा किंमती अंदाजे ३४५००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अवैधरीत्या विनापरवाना रेती (गौणखनिज) चा साठयावर आळा घालून दंडात्मक कारवाई करण्याकरीता तहसिलदार तहसिल कार्यालय पारशिवनी यांचे कडुन योग्य कारवाई करवुन घेणेकरीता पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे, पोलीस नायक विपीन गायधने यांचे पथकाने पार पाडली.