शहरातील पूरपरिस्थिती नियंत्रण संदर्भात मनपात कार्यशाळा

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठणकर यांच्या प्रमुख उपस्थिती “पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” (Geospatial Analysis of Flood Risk and Heat Wave) या विषयावर मंगळवारी (ता.९) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मनपा आयुक्त यांनी पूर पूर्व चेतावनी प्रणाली स्थापन करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. या मुळे नागरिकांना पूर बद्ल योग्य माहिती वेळेपूर्वी देता येईल. सध्या देशातील काही शहरांमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात नागपूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उत्पन्न होणारी पूर परिस्थिती तसेच उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यशाळेत यूएनडीपीच्या मार्गदर्शनाखाली अल्यूव्हियम इंटरनॅशनल व अल्यूव्हियम कंस्लटेंसी इंडिया यांच्याद्वारे आभासीपद्धतीने सादरीकरण करीत चर्चासत्र घेण्यात आले.

याप्रसंगी मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, साथरोग अधिकारी डॉ, गोवर्धन नवखरे, नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, मनपाच्या कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यूएनडीपीच्या शहर समन्वयक आरुषा आनंद, यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व अल्यूव्हियमचे पार्थ गोयल, आकाश मलिक, जाला अलोरा आभासीपद्धतीने उपस्थित होते.

कार्यशाळेला मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम शहरातील नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारणे तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात आलेल्या विश्लेषण अध्ययनाची माहिती जाणून घेतली. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नदी, पूर पूर्व चेतावणी प्रणालीची स्थापना (Early warning system), वेब पोर्टल, वेब अप आदी विषयांवर चर्चा देखील केली. याशिवाय पुरामुळे शहरातील जास्त प्रभावित होणारे क्षेत्र, नागरिकांमध्ये बदलत्या वातावरणाविषयी माहिती व जागरूकता आणि पूरस्थिती सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच पावसाळ्यात पुराचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक माहिती संबंधित विभागाने द्यावी अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासनाच्या ‘संवादवारी’ उपक्रमास वाल्हे येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Wed Jul 10 , 2024
पुणे :- आषाढी वारीत राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘संवादवारी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथे आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आषाढ वारी सोबतच्या संवादवारी उपक्रमात शासनाच्या जवळपास सर्व विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची तसेच विकासकामांची माहिती फिरते चित्ररथ, एलईडी व्हॅन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com