राज्यात ३५३ ठिकाणी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे आंदोलन 

 – राज्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांसमोर आंदोलनाचा ‘एल्गार’ 

 – आंदोलनातील सर्व विषय मार्गी लावू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

– माहिती महासंचालनालय मागण्या मान्य करण्यासंबंधी आग्रही

मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातल्या पत्रकार, पत्रकारितेशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या मागण्या समोर ठेवत आज राज्यातल्या ३५३ ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांसमोर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे अडीच हजारांहून अधिक पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांनी दखल घेतली आहे.

आज केलेल्या मागण्यांत पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. हे विषय घेण्यात आले होते.

मुंबईच्या आझाद मैदानावर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनानंतर संपूर्ण राज्याच्या वतीने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय यांचे सचिव यांना मागणीचे निवेदन दिले. प्रभारी माहिती महासंचालक हेमराज बागुल, राहुल तिडके- संचालक वृत्त, जनसंपर्क व दयानंद कांबळे- उपसंचालक वृत्त, यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. मागणी संदर्भात तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी सर्व मान्यवरांनी दिले. राज्यात आज विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, अशा 353 ठिकाणी धरणे आंदोलनात अडीच हजारांपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी राज्यातील ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांचे आभार मानले आहेत.

आंदोलनातील सर्व विषय मार्गी लावू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

आज राज्यभरामध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चं जे आंदोलन झाले त्या आंदोलनाची माहिती मी घेतली. हे सर्व महत्त्वाचे विषय आहेत. ते विषयी मी तातडीने मार्गी लावा, अशा सूचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत. विशेषता अधिस्वीकृती, कोरोनाच्या काळात जे पत्रकार वारले त्यांच्या कुटुंबाचा पुनर्वसन संदर्भातला विषय यावर तातडीने निर्णय होणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’टीव्ही विंगचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे आणि त्यांच्या टीमने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. लागलीच आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागतात, हे फार कमी वेळा घडते. जे आज ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या एकजुटीमुळे घडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने आभार मानले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वसामान्य मतदारांचा सन्मान करणारा निर्णय : संदीप जोशी

Fri May 12 , 2023
नागपूर :- मा. सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविलेला निर्णय या राज्यातील सर्वसामान्य मतदारांचा सन्मान करणारा निर्णय आहे, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कार्यालयाचे मानद सचिव माजी महापौर भाजपा नेते संदीप जोशी यांनी दिली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक कक्षेतून निर्णय नोंदवित राज्यातील सर्वसामान्य मतदारांना न्याय दिल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचे हक्क बहाल केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!