साईबाबा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार – आमदार चंद्रशेखर बावनकुळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी कन्हान मार्गवरील आडापूल साईबाबा मंदिर हजारो भक्ताचे श्रद्धास्थान बनले असून मंदिर परिसरात भक्तनिवास व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मत माजी मंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री साईबाबा मंदिर महोत्सवाच्या महाप्रसादाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले .

श्री साईबाबा मंदिर राज्य संस्थापक श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांचे हस्ते दहीहंडी फोडून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हजारो भक्तांनी श्री साईबाबाचा जयघोष करीत महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद कार्यक्रमाला माजी मंत्री व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार टेकचंद सावरकर, रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उद्योगपती अजय अग्रवाल,पप्पू अग्रवाल, पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, विशेष गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त एस तेली, सहाय्यक पोलीस उपायुक्त बी एन नलवाडे ,जुनी कामठीचे ठाणेदार राहुल शिंरे, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे ,वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस चौधरी, नागपूर शहर भाजप युवा मोर्चा युती विभाग प्रमुख डीपी बजाज ,सिंधू एज्युकेशन सोसायटी जरीपटका नागपूरचे अध्यक्ष विना बजाज नागपूर, शहर भाजप युवा मोर्चाचे श्रेयस रंगारी, प्रणय राखडे , नरेश बर्वे, मनोहर मनसुरकर, गणेश यादव ,दिलीप बडवाईक, रवी कोटपल्लीवार, जेता फुले, आशिष कावडे, नगरसेवक कमल यादव, चेतन साठवणे,उमाशंकर सिंह, सुदेश अग्रवाल, लाला खंडेलवाल, पवन रुगठा उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुदाम राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन राजू मुदगल यांनी मानले.

NewsToday24x7

Next Post

न्यु गोंडेगाव येथे विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव थाटात संपन्न

Wed Oct 12 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- परिसरातील न्यु गोंडेगाव येथे धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा अर्चना करून घटाची स्थापना आणि देवी मुर्तीची स्थापना करून नवरात्र महोत्सवाची सुरूवात करून मंडळाव्दारे विविध भजन, कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रमासह नवरात्र महोत्सव थाटात संपन्न करण्यात आला. सोमवार (दि.२६) सप्टेंबरला न्यु गोंडेगाव येथे धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com