संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पवनगाव-शिरपूर मार्गावरील यादव वानखेडे यांच्या शेताजवळील शिरपूर येथे 8 जुलैला रात्री साडे दहा दरम्यान जेवण करून मित्रांसह पायदळ फिरत असलेल्या दोन मित्रांना गावातीलच एका तरुणाने भरधाव वेगाने मागेहून जोरदार धडक दिली या घटनेत पायी जाणारे दोन मित्रांपैकी अंकुश पटले वय 26 वर्षे हल्ली मुक्काम पावनगाव किरकोळ जख्मि झाले तर दुसऱ्या मित्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नागपूर च्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र आज त्या जख्मि तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव महेश गजानन जुमडे वय 28 वर्षे रा शिरपूर कामठी असे आहे.पोलिसांनी यासंदर्भात आरोपी बजाज एम एच 40 सी जी 8790 चा चालक दीपक सोहन भोयर वय 27 वर्षे रा शिरपूर कामठी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी पसार असल्याने आरोपी अटकेपासून दूर आहे.