– मतदार संघाच्या विकासासाठी देवेंद्र भुयार यांनाच निवडून द्या – अजित पवार
– मोर्शी विधानसभेतील लढत विकासाच्या मुद्द्यावर !
मोर्शी :- मोर्शी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्र भूयार यांच्या प्रचारार्थ मोर्शी येथे अजित पवारांच्या उपस्थितीत विराट पदयात्रा काढण्यात आली त्यामध्ये आज पर्यंतच्या सर्वच रॅलींचे रेकॉर्ड तोडत ऐतिहासिक पदयात्रा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
मोर्शी विधानसभा मतदार संघातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट, पाणी पुरवठा योजना, मला मुलींसाठी वसतिगृह, डिजिटल अभ्यासिका, शेत पांदन रस्ते, सिंचन प्रकल्प, अंतर्गत रस्ते, डिजिटल शाळा, मोर्शी वरूड तालुक्यातील विविध हॉस्पिटल यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच प्रत्यक्षात कामे देखील सुरु झाली आहेत. ही सर्व कामे आमदार देवेंद्र भुयार यांच्यामुळेच झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना तुम्ही निवडून द्या मी त्यांना मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.मोर्शी विधानसभा मतदार संघाची निवडूणक संपूर्ण महाराष्ट्राकरीता पुन्हा लक्षवेधक ठरणार आहे. मतदार संघातील तमाम विरोधकांनी वेगवेगळ्या अफवा उडवून आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यकत्यांना विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतू तमाम कार्यकर्ते तेवढ्यात एकनिष्ठतेने उभे असल्याचे चित्र मोर्शी येथील ऐतिहासीक विराट पद यात्रेतून दिसून आले.
मोर्शी येथील आमदार देवेन्द्र भुयार यांची विराट पदयाञा व जनसमर्थन पाहुन पुन्हा एकदा देवेन्द्र च हवा, आमदार कसा हवा, तर काम करणारा व करुन घेणारा उमेदवार आमदार देवेंद्र भुयारच हवा असे अनेक लोक चर्चा करतांना बोलतांना आढळले. सदर विराट मिरवणुकीत हजारो लोकांचा जनसागर म्हणजे देवेन्द्र भुयारांच्या केलेल्या कामाची पावतीच आहे असे मिरवणुकीतील सहभागी नागरिक बोलत होते.
विक्रमी मताधिक्य नक्कीच मिळेल …..
मतदार संघातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता माझ्या सोबत असल्याने नक्कीच विक्रमी मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार समजूनच काम करत आहेत, असे मोर्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.