खर्रा विक्री व नॉन ओवन बॅग्सचा वापर करणाऱ्यांवर मनपाची कारवाई 

चंद्रपूर :- बंदी असलेल्या नॉन ओवन बॅग्सचा वापर करणारे व प्लास्टीक पन्नी मध्ये खर्रा विक्री करणारे दुकानदार यावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून दंड ठोठावला आहे.

जटपूरा गेट सरई मार्केट येथील सचिन कुकडे यांच्या मालकीच्या शक्ती प्रिंटर्स या दुकानात बंदी असलेल्या नॉन ओवन बॅग्सचा वापर केला जात असल्याचे मनपा उपद्रव शोध पथकास पाहणी दरम्यान निदर्शनास आले. प्लास्टीक बंदीचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्यावर ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच प्लास्टीक पन्नी मधे खर्रा विक्री करणारे अवि चीतडे, गोलू घोटेकर यांच्या दुकानांवरही कारवाई करून दंड वसुल करण्यात आला आहे.

शहरातील सार्वजनीक स्वच्छता अबाधित ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करणे, उपद्रव थांबविणे, प्लास्टीक कचरा नियम अंमलबजावणी व नागरीकांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या कृतीमध्ये व्यावहारीक बदल घडविणे व दंडात्मक कारवाई करणे यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले आहे.

आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल,उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, अतिक्रमण विभाग कर्मचारी मनीष शुक्ला, भरत बिरिया, विक्रम महातव, अनि खोटे, बंडू चेहरे, सुरक्षा रक्षक.डोमा विजयकर, श्याम यादव, गोपाल शांतोश्‍वर, गजानन विजयकर, सयद मोईनिद्दीन, अनिल निखाते, नागराज देवनूर अमरदीप साखरकर यांच्याद्वारे सदर कारवाई करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

आयुक्तांनी केली वडगाव झोन अमृत योजनेची पाहणी, पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे निर्देश

Thu May 18 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे वडगाव झोन हवेली गार्डन परिसरातील काम पूर्ण झाले असुन सदर कामाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व पाणी पुरवठ्यासंबंधी सर्व तक्रारी सोडवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.      पाणी पुरवठा झोन क्र. १५ अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com