गायक अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप यांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो बघून जशी शिसारी किंवा ओकारी यायला लागली आहे तेच मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याबाबतीत घडायला हवे म्हणजे जेथे जावे तेथे एकतर प्रत्यक्ष आशिष शेलार किंवा त्यांचे फोटो मुंबईकरांनी पदोपदी क्षणोक्षणी बघायला हवेत पण गेल्या वर्षभरापासून आमच्या गावात माझ्या लहानपणी आलेल्या एका जादूगारासारखे आशिष शेलार यांच्या बाबतीत घडतांना दिसते आहे ; म्हणजे त्या जादूगाराने आमच्या गावातल्या एका चावट नेत्याचे लघवी करण्याचे अवयव आधी गायब केले नंतर तो जादूगार स्वतःच गायब झाला तेच शेलार यांचे, आधी ते स्वतः गायब झाले त्यानंतर त्यांचे बॅनर्स पोस्टर्स देखील मुंबईकरांना दिसेनासे झालेले आहेत.
उगाच हवेत वार मी येथे करणार नाही तर आशिष शेलार भाजपाला किंवा भाजपाच्या वरिष्ठांना प्रामुख्याने दोन कारणांसाठी कंटाळले आहेत वैतागले आहेत त्रासले आहेत. त्यातले प्रमुख कारण म्हणजे आम्ही ज्या विरोधकांची विविध वेगवेगळी लफडी किंवा भानगडी भ्रष्टाचाराची प्रकरणे मेहनत करून जीवावर उदार होऊन विरोध पत्करून अनेकांशी पंगा घेऊन प्रसंगी दंगा करून रिस्क घेऊन बाहेर काढायची, काही दिवसांनी आम्ही बाजूला, अडगळीत आणि ज्या हरामखोरांना आम्ही नामोहरम करून प्रसंगी कायद्याच्या बडग्याखाली जेरीस आणले त्यांना जर आमचे दिल्लीतले नेते जवळ घेऊन वरून सत्तेत सामील करवून घेत असतील त्यात आमचा घोर अपमान तर होतोच पण ज्यांना आम्ही जगणे राहणे मुश्किल केले. ते विरोधक आमच्या शेजारी बसून जर आम्हालाच वाकुल्या दाखवून मोकळे होणार असतील तर मुंबई शहराचे दगदगीचे आणि खर्चिक नेतृत्व किंवा अध्यक्षपद भूषवून करायचे काय, हा सवाल जाहीर नव्हे पण खाजगीत कारताहेत श्रीमान आशिष शेलार!!विरोधकांना पप्पी आणि भाजपा नेत्यांना कार्यकर्त्यांना समस्त संघ दक्षवाल्यांना अडगळीची खोली, आशिष शेलार सहित सारेच दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांवर मनापासून रागावलेले आहेत…
आमदार आशिष शेलार यांची सर्वाधिक तीव्र नाराजी स्वपक्षीयांबद्दल आहे. ज्यांच्या तोंडावर थुंकायचे त्यांना खुशीत येऊन कुशीत घेणे त्यावर शेलार अस्वस्थ आहेत त्याचवेळी क्रिकेट विश्वात जर मी शरद पवारांची मदत घेतली, सहकार्य घेतले तर माझ्याच पक्षातल्या विशेषतः मुंबई भाजपामधल्या बहुतांश नेत्यांनी माझा पार संजय राऊत केला म्हणजे शरद पवार के दो यार, संजय राऊत और आशिष शेलार, अशी माझी उघड जाहीर बदनामी करून मला कायम अडचणीत आणल्या गेले.
आशिष शेलार म्हणजे शरद पवारांचा खास माणूस हे कारण पुढे करत मला मुद्दाम सत्तेपासून दूर ठेवण्यात आले, ज्या भाजपासाठी मी झिजलो, मुंबईत कधी नव्हे ते भाजपाचा दबदबा धाक दरारा वचक निर्माण केला ज्यात केवळ माझाच मोठा सहभाग होता, ऐनवेळी माझ्या नको त्या मालमत्तेचा विविध व्यवसायांचा तपशील दिल्ली दरबारी देऊन भाजपाच्या भरवशावर श्रीमंत झालेला होणारा नेता म्हणून माझी आधी पद्धतशीर बदनामी मुंबईतल्याच आमच्या काही विघ्नसंतोषी नेत्यांनी आमदारांनी मुंबईतल्या विरोधकांना हाताशी धरून माझी मोठी बदनामी आधी केली आणि मला सत्तेपासून जाणूनबुजून दूर ठेवले, हि ती आशिष शेलार यांची खाजगीतली खंत आणि नाराजी.
सतत केवळ पक्षाची हमाली आणि मंत्रिपद विरोधकांच्या हवाली, अस्वस्थ आहेत नाराज आहेत निराश झाले आहेत आशिष शेलार म्हणूनच गेल्या तब्बल वर्षभरापासून मुंबईतला भाजपा एखाद्या निष्णात जादूगारासारखा ऐन मोक्याच्या वेळी गायब आहे, महापालिका किंवा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असतांना त्याचवेळी मुंबईतले शिवसेनेसहित इतर सारेच राजकीय पक्ष बॅकफूट वर असतांना मुंबईकरांवर प्रभाव टाकून त्यांना आपलेसे करण्याची नेमकी संधी चालून आलेली असतांना पक्षासाठी विशेष काहीही न करणाऱ्या किंवा हात झटकून मंत्रिपद उपभागणार्या व्यवहारी मंगलप्रभात लोढा यांची चंगळ आणि आशिष शेलारांच्या मागे मंगळ, शेलार अस्वस्थ असणे स्वाभाविक आहे म्हणून ते गेल्या वर्षभरापासून भाजपावर नाराज आहेत भाजपापासून तर थेट आपल्या विधान सभा मतदार संघापर्यंत सर्वत्र दूर आहेत अलिप्त आहेत, नेमकी हीच संधी साधून, आशिष शेलार अध्यक्ष आणि आमदार म्हणून कसे निष्क्रिय आणि निष्प्रभ, पद्धतीने मोठ्या युक्तीने त्यांची पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर बदनामी सुरु आहे ज्याचा शेलार यांना ना खेद आहे ना खंत आहे कारण त्यांची आता बरे वाईट परिणाम भोगण्याची मानसिकता आहे, मंगलप्रभात लोढा ऐवजी आशिष शेलार मंत्रिमंडळात, बरे झाले असते थेट मुंबईतल्या भाजपा कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे म्हणणे सांगणे आहे पण आशिष शेलार यांचा राजकीय सूड थेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच उगविला असल्याची चर्चा देखील उघड व जोरात आहे.
आशिष शेलार विना मुंबई भाजपा म्हणजे नवरा दुबईत आणि उफाडी बायको मुंबईत, अशी मुंबई भाजपाची केविलवाणी लाजिरवाणी अवस्था या दिवसात झालेली आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी