28 डिसेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

गडचिरोली : राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कलागुणांना वाव देवून, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे व्दारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते.

त्याअनुषंगाने केंद्र शासनामार्फत सन 1994 पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. या करीता राज्यामध्ये जिल्हास्तर,विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा संघ निवडण्यात येतो.

त्याअनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा 15 वर्ष पुर्ण व 29 वर्षाआतील वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे दि. 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजीत करण्यात येत आहे. सदर युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य ( Folk dance ) व लोकगित ( Folk song ) या दोन बाबींचा समावेश असून, लोकनृत्य मध्ये साथसंगतसह जास्तीत जास्त 20 कलाकारांचा सहभाग असावा व लोकगित मध्ये साथसंगतसह 10 कलाकारांचा समावेश असावा व सर्व कलाकाराचे वय 15 ते 29 वर्ष वयोगटातील असावे.

सदर स्पर्धकांनी आवश्यक वाद्यवृंद व साहित्य सोबत आणणे आवश्यक असून, लोकगित व लोकनृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी पुर्वध्वनी मुद्रीत टेप अथवा रेकॉर्डींगवर कार्यक्रम सादर करता येणार नाही व लोकगीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे. साथसंगत सोबत असणे आवश्यक आहे. सदर महोत्सवात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना विभागीय महोत्सवाकरीता प्रवेश देण्यात येईल. तरी गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवक मंडळे, संगीत विद्यालय,स्वयंसेवी संस्थेतील युवक युवतींनी लोकनृत्य व लोकगीत या बाबीमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपला प्रवेश नोंदवून जिल्हा युवा महोत्सवात सहभाग घ्यावा,व आपला प्रवेश दि. 27 डिसेंबर 2022 पर्यंत सहभागी कलाकारांचे नावासह प्रवेशयादी, मोबाईल नंबर,संस्थेचे नाव व प्रत्येकाच्या जन्मतारखेच्या दाखला व रहवासी पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे नोंदवावा. किंवा dsogad2@gmail.com या मेलवर मेल करावा. तसेच अधिक माहिती व नियम अटीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

NewsToday24x7

Next Post

एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत

Tue Dec 27 , 2022
गडचिरोली : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात गडचिरोली प्रकाल्पांतर्गत कार्यान्वीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल मधील इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी चे तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com