पोलीस ठाणे कपीलनगर येथे मिसींग मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

नागपूर :- “गणेशोत्सवाचे” औचित्य साधुन पोलीस ठाणे कपील नगर चे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग मोवाईलचा तांत्रिक पद्धतीने व बुद्धी कौशल्याने शोध घेवुन व ते हस्तगत करून पोलीस ठाणे कपीलनगर येथे अर्जदारांचे हरविलेले मोवाईल पैकी माहे ऑगस्ट २०२४ मध्ये हस्तगत केलेले वेगवेगळे कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमती अंदाजे २,४२,१४२/- रू. चे त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्याबाबत अर्जदारानी समाधान दर्शवुन पोलीसांचे मनः पुर्वक आभार व्यक्त केले. सन २०२४ मधील मिसींग मोबाईल पैकी एकुण ७६ मोबाईल मुळ मोबाईल धारक अर्जदार यांना परत करण्यात आले आहेत. तसेच, यापुर्वी सुद्धा कमीलनगर पोलीसांनी अथक परिश्रम घेवुन सन २०२२ व सन २०२३ चे एकुण २०० मोबाईल हे मुळ मोबाईल धारक अर्जदरांना परत करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी  निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. क्र ०५), नागपूर शहर, संतोष खांडेकर सहा पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग) नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, महेश आंधळे, मपोहवा. गौरी हेडाऊ, सायबर मदतनीस पोअं. आशिष व सचिन टांगले यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपुरात

Sun Sep 15 , 2024
– रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे त्यांच्या हस्ते लोकार्पण – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही राहणार उपस्थिती नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन दिनांक १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. रामदेबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com