कामठी मौदा विधानसभेतील समस्त कांग्रेस तालुका, शहर महिला अध्यक्षपदाची निवड  

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणी नियुक्ती कार्यक्रम माजी पशुसंवर्धन मंत्री व आमदार सुनीलबाबू केदार यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी कामठी मौदा विधानसभेतल्या सर्व तालुका व शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुद्धा नेमण्यात आले, यात कामठी ग्रामीण अध्यक्षपदी कामठी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे, कामठी शहर अध्यक्षपदी सुराया बानो ,मौदा शहराध्यक्षपदी कल्पना मानकर, मौदा तालुका अध्यक्षपदी कल्पना बावनगडे व महादुला शहर अध्यक्षपदी अश्विनी वानखेडे यांची नियुक्ती माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी प्रामुख्याने माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, उमरेड विधानसभाचे आमदार राजू पारवे, रश्मी बर्वे, अध्यक्षा नागपूर जिल्हा परिषद व महिला काँग्रेसच्या सर्व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे आयोजन नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा,कुंदा राऊत यांनी केलं असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com