ओडिशातील रेल्वे दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

– पंतप्रधान स्थितीची समीक्षा करण्यासाठी ओडिशाच्या दौऱ्यावर

मुंबई :- ओडिशा राज्यात झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी स्वतः ओडिशाच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ओडिशातील भयानक रेल्वे दुर्घटनेनंतर झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. अपघातग्रस्तांचे बचावकार्य, मदत आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याशी संबंधित सर्व पैलूंवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशा भेटीसाठी निघाले असून रेल्वे अपघातांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय करआकारणीवर भारत G20 - साऊथ सेंटर कार्यक्रम नागपूर येथे यशस्वीरित्या संपन्न

Sat Jun 3 , 2023
नवी दिल्ली :- भारताच्या G20 अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर ग्लोबल साऊथचे मत मांडण्याचा प्रयत्न करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरत 1 आणि 2 जून 2023 रोजी नागपुरात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT) येथे आंतरराष्ट्रीय कर आकारणी बाबत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतासह 55 विकसनशील देशांच्या आंतर-सरकारी धोरण संशोधन गटाचा समावेश असलेल्या जिनिव्हा स्थित साऊथ सेंटरच्या सहकार्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com