महाराष्ट प्रदेश भिक्खुसंघ प्रदेश स्तरीय अधिवेशन समापन समारोह

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपुर :- ऑल इंडिया भिक्खुसंघ अंतर्गत महाराष्ट प्रदेश भिक्खुसंघ प्रदेश स्तरीय दोन दिवस अधिवेशन दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पूज्य भिक्खू व श्रामणेर उपस्थित होते. यापूर्वि १९९७ ला याच पवित्र दीक्षाभूमीवर ऑल इंडिया भिक्खुसंघा चे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते.

उपरोक्त अधिवेशनात दोन दिवस भिक्खुसंघाच्या अंतर्गत व बाह्य डी-अडचणींच्या सबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यानिमित्त पूज्य भिक्खुसंघाने वर्तमानकालिन विपरित परिस्थीतीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत प्रबुद्ध भारत निर्माण करण्याकरिता व तथागत बुद्ध यांनी सांगीतलेला धम्म-विनय आचरणात आणून भिक्खुसंघाने आप-आपसातील मतभेद दूर करावे, वर्तमान सामाजिक – धार्मिक परिस्थितिला अणुसरून, ध्यान, चिंतन-मनन, अभ्यासुवृत्ती, अनुशासन बद्धता, सांघिकता निर्माण करावी आणि गांव कुसातील जनसामान्य लोकांपर्यत बाबासाहेबाना अपेक्षित धम्म विचार पोहचविण्या काटेकोर प्रयत्न करीत स्वताला धम्म मार्गावर प्रतिष्ठित करण्याकरीता प्रयत्नशील राहावे.

राग, द्वेष, मोह, अहंकार, तृष्णा, भेदभाव, विरोधाभास, अज्ञान, अंधकार, चमत्कार, स्वार्थभाव, भौतिक ऐहिकतारूपी मार वृत्तीचा त्याग करून निष्कलंक, निष्पाप, निर्विकार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. याकरीता डोळ्यात अंजन घालून मार्गक्रमन करणे सोयीचे ठरेल, असे आवहान करण्यात आले.

भारतात १९७१साली देशातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य विद्वान भिक्खुनी एकत्रीत येवून उपरोक्त संघाची स्थापना केली. एकसंघ भिक्खुसंघ असतांना काही संधीसाधु, स्वार्तांध नेतृत्वाचा हव्यास बाळगनार्या संघविरोधी, विनयविरोधी देवदत्त, बिभीषण प्रवृत्तीच्या भिक्खूंनी समांतर संघ स्थापित करून अनुशासनहीन, चंगळवादी, अवास्तविक भिक्खुंची गर्दी निर्माण केली, ज्यामुळे अज्ञानी, पोटार्डे, कुटूंबपोस, अनैतिक कर्मी, व्यसनाधिन, अवास्तविक, अवांछित कृत्य करणार्याची, घरोघरी फिरून समाजाकडून वर्गनी मागणार्याची फसगती करणारी फळी काषाय वस्त्राच्या आड राजरोष पणे धम्माला ग्लानी आणत आहेत. यासाठी भिक्खुसंघ व समाजाने जागृत राहणे गरजेचे आहे.

 या अधिवेशनात काही ठराव पारित करण्यात आले.

* अजिंठा लेणीच्या पायथ्याशी आंतरराष्ट्रीय पाली विध्यापिठ स्थापन करण्यात यावे.

* बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार चे हस्तांतरण भिक्खुसंघास द्यावे.

* बौद्ध विवाह व वारसाहक्क कायदा पारित करण्यात यावा.

* बौद्धांचे श्रद्धास्थान बुद्धगया येथे महाराष्ट सदन बांधण्यात यावे.

* पालीभाषेला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा.

* एम. पी. एस सी. , यु. पी. एस सी. च्या परिक्षा मध्ये पाली भाषेला समाविष्ट करण्यात यावे.

* भारतीय जणगननेत धम्म बौद्ध व जात अनुसुचित जाती अशी नोंद करावी.

* भारतातील बौद्ध लेण्या, स्तुप चैत्य व पुरातत्व अवशेषांचे संरक्षण व संवर्धन करावे तसेच अतिक्रमण काढावे.

* थायलंड वरून दान स्वरूप येणार्या बुद्धमुर्तीवर लागणारे कस्टम चार्ज बंद करावा.

* भरतात बौद्धांवर होणारा अत्याचार, जोर – जुलूम विविध विरोधाभास नाहीसे करून सन्मानाने विचरण करता यावे. आदी ठराव पारित करण्यात आले.

तसेच भिक्खुसंघास मजबूत व संघटीत करण्याकरीता अनुशासनबद्ध करण्यात यावा यासाठी प्रत्येक भिक्खुने वेळोवेळी एकत्रीत येणे, संघविनयाचे व शीलांचे पालन करणे, उपोषथ व पातिमोक्खा चे नियम अंगीकृत करणे, समाजात धम्म प्रसार-प्रचार करतांना सर्वसमावेशी, द्वेष रहित, विरोधाभास रहीत, समतामूलक सार्वभौम वातावरण तैयार करणे.

वरिष्ठ भिक्खुंचा सन्मान राखला जाईल याची खबरदारी बाळगणे, आपल्यामुळे धम्माला ग्लानि येणार नाही ह्याची व स्वचारीत्र्याला गालबोट लागणार नाही याची सजगता बाळगणे, जास्तीत – जास्त संख्येत भिक्खुसंघाच्या संथीगारात एकत्रीत राहणे, नवोदित श्रमण दीक्षीत करताना खबरदारी बाळगणे, आदी विषयांवर निर्णय घेण्यात आले.

उपरोक्त समारोपीय कार्यक्रमास प्रामुख्याने भदंत धम्मसेवक महास्थविर, (अध्यक्ष, महाराष्ट प्रदेश भीक्खु संघ), भदंत बोधिपालो महास्थविर, भदंत महापंथ महास्थविर, भदंत संघानंद महीस्थविर, डाॅ. भदंत उपगुप्त महास्थविर, डाॅ. भदंत धम्मसेवक महास्थविर, डाॅ. भदंत ज्ञानदिप महास्थविर, भदंत प्रियदर्शी महास्थविर, भदंत ज्ञानज्योती महास्थविर भदंत विनयरक्खीत महास्थविर, भदंत बुद्धघोष महास्थविर, डाॅ धम्मोदय महास्थविर, डॉ. भदंत सीलवंस महास्थवीर, भदन्त ज्ञानरक्षित स्थविर, भदंत ज्ञानबोधी महास्थविर, भदंत सुमनवन्नो महास्थविर, आणि महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेले भिक्खुसंघ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

उपरोक्त अधिवेशनाची यशस्वी वाटचाल राहील्या बद्दल भदंत नाग दिपंकर महास्थविर, (विश्वस्त परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती) यांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात. समारोपीय आभार भदंत ज्ञानबोधी महास्थविर यांनी उपस्थीतांचे व दानदात्यांचे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेवा व सहकार्य करणार्याचे प्रती कृतक्षता व्यक्त केली. मंगल मैत्री पर आशिर्वाद प्रदान करण्यात आले आणि राष्ट्रगिताने समापन करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय?

Tue May 16 , 2023
मुंबई :- लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि आघाडीत कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने मविआचं जागा वाटप कसं होणार, याबाबत चर्चा होत होती. आता महाविकास आघाडी लोकसभेसाठीचा फॉर्म्युला समोर आला आहे. विरोधक कायमच महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याची टीका करतात. शिवाय तिन्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com