यवतमाळात २८ जुलैला महाराष्ट्र शेतकरी परीषद

यवतमाळ :- ‘ रोज रोज मरण- रोज पेटते सरण- निगरगट्ट धोरण- अजुन किती करणार सहन? ’ असा सवाल उपस्थित करीत शहरातील वडगाव रोडवरील सहकार सभागृहात रविवार २८ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० दरम्यान अनेक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी परिषदेला शेतकरी नेते विजय जावंधिया, रघुनाथ पाटील, वामनराव चटप, अमर हबीब, प्रकाश पोहरे, ज्ञानेश वाकुडकर यांची उपस्थिती राहणार असुन ‘ कृषी बाजारात हस्तक्षेपाने भाव पाडणे, शेतकरी आत्महत्या आणि त्यावर उपाय’ या विषयावर परिषदेच्या प्रथम सत्रात सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत विजय जावंधिया, रघुनाथ पाटील व वामनराव चटप यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. परिषदेच्या दुसर्‍या सत्रात दुपारी १.३० ते ४.३० या कालावधीत ‘ निष्फळ आंदोलने, प्रतिसादशुन्य धोरणकर्ते म्हणून लढा व आयुधांचा पुनर्शोध’ या विषयावर अमर हबीब, प्रकाश पोहरे, ज्ञानेश वाकडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या परिषदे दरम्यान शेतजागलच्या ‘ किसान कृतज्ञता कोषातून’ आत्महत्याग्रस्त विधवा भगिणींना अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार असुन विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी सनदचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे संयोजक व शेतजागल विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुुरूषोत्तम गावंडे, प्रा. किशोर बुटले, प्रा. यादवराव ठाकरे, शुभम मुंडवाईक आदींनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील 10 टक्के मतदार मतदानापासून वंचित! - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी

Thu Jul 25 , 2024
· दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांशी 11 मुद्दयांवर चर्चा मुंबई :-विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने महाराष्ट्रातील सुमारे 10 टक्के मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. बुधवार, 24 जुलै रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com