वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे महापरित्राणपाठ व विशेष बुद्धवंदना चे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-‘पंचशील शांती मार्च च्या माध्यमातून देणार शांतीचा संदेश

कामठी :- वैशाख बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने पुज्यनिय भिक्कु संघाच्या उपस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या पूर्व संधेवर गुरुवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता पासून मध्यरात्री पर्यंत महापरित्राण पाठ चे आयोजन करण्यात आले आहे.या महापरित्राणपाठ कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका श्वेत रंगाचे पोशाख परिधान करून उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार 5 मे ला सकाळी 10 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना घेण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित भिक्षु संघाला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते चिवरदान व संघदान देण्यात येईल.त्यानंतर सकाळी 11 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत पंचशिल मार्च काढण्यात येणार आहे. या पंचशिल मार्च चे वैशिष्ट् असे आहे की शंभर मीटर लांब असलेला पंचशील ध्वज घेऊन शेकडो विद्यार्थी ,बौद्ध उपासक व उपासिका यात सहभागी होणार आहेत.कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर मिटर लांब पंचशील ध्वजाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये शांतीचा संदेश देण्याकरिता हा अभिनव उपक्रम दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रांतर्फे घेण्यात येणार आहे.     शनिवार दिनांक 6 मे रोजी वैशाख बौद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून ड्रॅगन पॅलेस टेम्पल।परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय सामूहिक ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा शुभारंभ सकाळी 10 वाजता होणार असून सायंकाळी 4 वाजता सामूहिक ध्यान शिबिराचा समारोप होणार आहे.या ध्यान शिबिरामध्ये ऑनलाइन नोंदणी व्यतिरिक्त साधकांना थेट सहभागी होता येईल.अशी माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटरच्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.

..वैशाख पोर्णिमेच्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्वच्छ धुवून काढण्यात येत आहे.ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मध्यभागी असलेल्या 864 किलो वजनाची अखंड चंदनाची तथागतांच्या मूर्ती समोर सुंदर रंगीबिरंगी फुलांनी सजविण्यात येत आहे .ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथिल बगीच्या मध्ये विविध रंगाच्या फुलांचे झाड लावण्यात येत आहेत.व ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा संपूर्ण परिसर पंचशील च्या झेंड्यानी न्हाऊन गेला आहे.तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला आकर्षक विद्दुत रोषणाईने सजविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र दिनी 'आपला दवाखाना' चे वाडीत उदघाटन !

Wed May 3 , 2023
मुख्यमंत्रांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन. वाडी :- 1मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे राज्यभरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक ‘आपला दवाखाना’चे उदघाटन सकाळी10. 30 वा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उदघाटन होणार आहे. राज्यभरातील अनेक सार्वजनिक दवाखान्या सह वाडी परिसरात मंजूर करण्यात आलेल्या आपला दवाखान्याचे उदघाटन .वाडी येथील शिवशक्ती नगरात करण्यात आला. दवाखान्याच्या उदघाटन कार्यक्रमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com