“हैदराबादेत हजारो नागरिक योग उत्सवात सामील”

– आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या २५ दिवस उलट गणतीचे (कॉउंटडाउन) औचित्य
हैदराबाद : तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्याराजन यांनी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत दिनांक २७ मे २०२२ रोजी हैदराबाद येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या २५ दिवसांच्या उलट गणती (काउंटडाउन) कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर राज्ये विकास मंत्री, जी किशन रेड्डी; राज्यमंत्री महेंद्र मंजुपारा (आयुष मंत्रालय), आयुष मंत्रालयाच्या सहसचिव, कविता गर्ग; डॉ. ईश्वर बसवराद्दी, संचालक – मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान (MDNIY) आणि प्रख्यात योग गुरु, चित्रपट तारे, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, सेलिब्रिटी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने योगप्रेमी, विद्यार्थी व सामान्य नागरिक सहभागी झाले होते.  

भारताची सनातन योग संस्कृती आणि तिचे फायदे तळागाळात सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनांक २१ जूनपर्यंत देशभरात ‘१०० दिवस, १०० शहरे, १०० संस्था’ या मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे नियोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लुंबिनीनगरात 44 हजाराची घरफोडी

Sun May 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लुंबिनी नगरातील एका कुलूपबंद घरात अवैधरित्या प्रवेश करून घरात सुरक्षित ठेवलेले नगदी 5 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 44हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल सायंकाळी पाच दरम्यान निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी अश्विन गवई वय 31 वर्षे रा लुम्बिनी नगर कामठी ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights