विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात आंतरराष्ट्रीय योग परिषदेचा समारोप संपन्न
अमरावती :- धकाधकीच्या जीवनात वाढत असलेला ताण-तणाव, बदललेली जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण व बदलेली आहार पध्दती यातून विविध आजाराची लागण मानवाला होत असते. पर्यायाने ही समाजाला लागलेली कीड असून अशा परिस्थीतीत मानवाला चांगले जीवन जगायचे असेल तर नैसर्गीक संसाधनाशिवाय पर्याय नाही. निसर्गोपचार आणि योग अशा परिस्थीतीत संजीवनी ठरत असून मानवाने निसर्गोपचार ही जीवन जगण्याची कला आत्मसात करावी, कारण चांगले जीवन जगणे निसर्गोपचाराशिवाय अशक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. दिल मोहम्मद मखदुमी यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि नॅचरोपॅथी अॅन्ड योगा मल्टीपर्पज असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, डॉ. एन.पी. सिंग, डॉ. प्रदिप टाकु, डॉ. संतोष आगरकर, डॉ. रणजीत बसवनाथे व विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुभाष गवई म्हणाले, निसर्गोपचार व योग ही चिकित्सा पध्दत मनुष्याच्या जीवनात आरोग्य प्रदान करण्याची महत्वाची भुमीका पार पाडत असून अशा परिषदेच्या आयोजनामुळे त्याची जाणीव-जागृती होत आहे. समाजाने निसर्गोपचार व योग हा जीवनाचा अविभाज्य भाग म्हणुन आत्मसात करावा, असेही ते म्हणाले. डॉ. प्रदिप टाकु, जनरल सेक्रेटरी अखिल भारतीय प्राकृतीक चिकीत्सा परिषद न्यु दिल्ली, डॉ. एन पी. सिंग, जनरल सेक्रेटरी अखिल भारतीय प्राक्रतीक चिकीत्सा परिषद कोलकत्ता, डॉ. रामचंद्र पवार, कोल्हापुर, डॉ. आनंद मांजरखेडे, डॉ. सोनु कुमार सुद, डॉ. रणजीत बसवनाथे, डॉ. नदिम अहमद, डॉ. संजीवन गौतम यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिलीत.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे म्हणाले, आरोग्य हे मन, शरीर आणि आत्मा यांच्या संतुलनावर अवलंबुन असून यातील समतोल साधण्याचे कार्य निसर्गोपचार व योग या चिकीत्सकीय पध्दतीने करता येणे शक्य आहे. आरोग्य-विचार आणि मानसीक स्वास्थ उत्तम व निरोगी ठेवण्याकरीता या आंतरराष्ट्रीय परिषेदच्या माध्यमातून प्रमुख वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा वापर प्रत्येक व्यक्ती, कुटंब व समाजाने आपल्या जीवनपध्दती मध्ये करावा, जेणेकरुन आनंदमय व सुखी जीवन जगण्याकरीता मदत होईल. तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने घेतलेल्या पुढाकाराने निसर्गोपचार व योग प्राकृतीक परिषद ही जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशील व प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी विविध मान्यवरांचे व संबंधीत डॉक्टरांचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अश्विनी राऊत यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील आणि नॅचरोपॅथी अँड योगा डॉक्टर्स मल्टीपर्पज असोसिएशन इंडियाचे पदाधिकारी डॉ. रणजित बसवनाथे, डॉ.नदीम अहमद, डॉ. संजीव गौतम, डॉ. नारायण अंभोरे, डॉ. विकास पांडे, डॉ. रवींद्र तायडे तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील प्रा. मंजुषा बारबुद्धे, प्रा शुभांगी रवाळे, डॉ. प्रशांत भगत, प्रा. मयूर विरुळकर, डॉ. आदित्य पुंड, डॉ. अश्विनी राऊत, डॉ. बी. बी. चिखले, प्रा. सुरेश पवार, प्रा. वैभव जिसकार, प्रा. विनय पदलमवार, प्रा मनीषा लाकडे, प्रा. शिवानी अग्रवाल, प्रा. स्वप्निल ईखार, प्रा.स्वप्निल मोरे, प्रा. राधिका खडके, प्रा. मनोज वाहने, डॉ. वैभव मस्के, प्रा. राहुल दोडके, प्रा. संदीप महल्ले, प्रा. माधुरी पूनसे, प्रा. अर्चना ढोरे तसेच दिपक अडसड, विक्क्ी ठाकरे, विलास राऊत, सुरज महल्ले, अंकुश तायडे, शुभम मेटांगे, सुमेध तायडे यांनी सहकार्य केले.