गाडेघाट शेतशिवारात बाधलेले कानपुरी गो-हाची बिबट्याने केली शिकार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

परिसराच्या गावात पुन्हा दहशतीने या बिबटया चा वन विभागाने योग्य बंदोबस्त करण्या मागणी.

कन्हान : – ग्रा पं जुनीकामठी अंतर्गत गाडेघाट चे शेतकरी अतुल खंते यांच्या शेतात बांधलेल्या कानपुरी गो-यावर बिबट्याने मागुन हल्ला करित शिकार जागी ठार केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक व कर्म चारी पोहचुन पंचनामा करून पुढील कारवाई करिता अहवाल संबंधिताकडे पाठविल्याने ग्रामस्थ शेतक-यां नी पिडीत पशु मालकास नुकसान भरपाई देण्याची तसेच या बिबटयाचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रविवार (दि.१९) जुन ला रात्री शेतकरी अतुल मोहन खंते हे गाडेघाट शेतशिवारात आपल्या शेतात मोकळ्या जागेवर गायी व कानपुरी गोरा, गाय बांधुन घरी गेले होते. सोमवारी पहाटे सकाळी बिबट्याने कानपुरी गो-या वर मागुन हल्ला करून शिकार केली. सोमवार (दि.२०) जुन ला सकाळी ९ वाजता दरम्यान अतुल खंते हे आपल्या शेतात जनावरांना चाऱ्या पाणी देण्याकरिता व शेती कामाकरिता शेतात आले असता कानपुरी गोरा मृत अवस्थेत दिसुन आल्याने त्यांनी सदर घटनेची माहिती वनरक्षक पटगोवारी श्रीकांत टेकाम याना दिली. तर वनरक्षक यांनी आपले वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिका-याना माहीती दिल्याने घटनास्थ ळी वनरक्षक श्रीकांत टेकाम, वन परिक्षेत्र अधिकारी अशोक दिग्रसे आपल्या कर्मचा-या सह पोहचुन पाह णी व तपासणी केली. १ वर्षाचा कानपुरी गोरा मृत आणि त्याला मागुन थोडे खाल्लेला दिसुन आले. तसे च गोराच्या मानेला वन्यप्राणीचे दातांचे निशाने स्पष्ट पणे आढळुन आले. जवळच असलेल्या जागेवर वन्य प्राणी बीबट यांच्या पंजाचे निशान स्पष्टपणे दिसुन आले. घटने बाबत पशुमालक अतुल खंते यास विचार पुस केली असता त्यांनी सांगितले की, रोज प्रमाणे मी माझे पाळीव जनावरे माझ्या शेतातील जागेवर बांधत असतो. सोमवार ला सकाळी ९ वाजता मी माझ्या शेतातील जनावरांना चारा पाणी व शेताची कामे कर ण्यासाठी आले असता माझा गोरा मृत व त्यास मागुन थोडे खाल्लेले दिसल्याने घटनेची माहिती श्री एस जे टेकाम पटगोवारी यांना फोन करून दिल्याने वनविभा गाचे अधिकारी व वन कर्मचारी हयांनी घटनास्थळी येऊन पाहणी व तपासणी करून घटनेचा अहवाल संबधितांना पाठवुन पुढील चौकशी करीत आहे. गाडेघाट रहिवासी व ग्रा प जुनीकामठीचे उपसर पंच राहुल ढोके, ग्रा पं सदस्य भुषण इंगोले, शेतकरी पारस यादव सह गावक-यांनी शेतकरी पशु मालक अतुल खंते हयांचा कानपुरी गोरा विबटयाने शिकार करून ठार केल्याने शेतक-यांचे झालेले नुकसान भर पाई त्वरित देण्यात यावी तसेच या वन्य प्राणी बिबट यामुळे परिसरातील गावात मागील सहा महिन्या पासु न अनेक प्राळीव जनावराची शिकार करित असुन सुध्दा वन विभागा व्दारे बिबटयास पकडुन दुर जंगला त नेऊन सोडण्यात आले नसल्याने परत या घटनेने गावकरी शेतक-यात दहशत निमार्ण झाल्याने बिबटया चा वन विभागाने योग्य बंदोबस्त करून शेतक-यांना सं रक्षण देण्याची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक दिग्रसे व वनरक्षक श्रीकांत टेकाम हयांच्या मार्फत वन विभाग आणि संबधितांना करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बखारी शेतात वीज पडुन एक महिला मृत तर सात मजुर जख्मी

Mon Jun 20 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी चार मजुर महिलेचा आयसीओ मध्ये तर १ पुरूष व १ महिलेचा जनरल वार्डात उपचार सुरू. कन्हान : – पासुन उत्तरेस १५ किमी लांब पेंच नदी काठावरील बखारी (पिपळा) येथे शेतात कपाशी च्या बियाची (सरकीची) लावण करित असताना दुपारी वादळ वा-यासह शेतात अचानक वीज पडल्याने सरकी लावणा-या एका महिलेचा घटनास्थळीच मुत्यु झाला. तर दोन पुरूष व सहा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com