नागपूर :- नागपूर महानगर पालिकेच्या वतीने मुघल साम्राज्यच्या विरोधात लढा देणारे, शौर्य व स्वाभिमानाचे प्रतिक महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पित करून अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, बाजार विभागाचे अधीक्षक प्रमोद वानखेडे, परिवहन विभागाचे लुंगे, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, कैलास लांडे, राजू मेश्राम आणि शैलेश जांभुळकर उपस्थित होते.
महाराणा प्रताप सिंग जयंती निमित्त़ विनम्र म.न.पा. तर्फे अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com