संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-नगर परिषद निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगुल
-ओबीसी आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा
कामठी ता प्र 11:-आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली असून 9 जून ला कामठी नगर परिषद च्या 17 प्रभागाची अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच तडकाफडकी 13 जून सोमवारला प्रभागाची आरक्षण सोडत होणार आहे.ही आरक्षण सोडत कामठी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार आहे .तरी इच्छुकांनी या आरक्षण सोडतीला उपस्थित राहावे असे आव्हान कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.
कामठी नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 प्रभागाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असून हे आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदासाठी काढण्यात येणार आहे.या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती वा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून या कालावधीत दाखल करता येतील.29 जून ला संबंधित अधिकारी सदस्यपदाच्या आरक्षणास मान्यता देणार असून आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
13 जून सोमवारला होणाऱ्या आरक्षण सोडतिकडे कामठीतील राजकीय पक्षाच्या इच्छुकांचे त्याकडे लक्ष लागले आहे.अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच अगदी तीन दिवसानंतर प्रभागाची आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केल्याने आगामी निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असे संकेत दिसत आहेत तर इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कम्बर कसली असली तरी आरक्षण सोडतीवर त्यांचे राजकोय भवितव्य अवलंबून राहणार आहे.
–कामठी नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम
13 जून -आरक्षण सोडत काढणे 15 जून-हरकती व सूचना मागविण्यासाठी नगर परिषद वेबसाईटवर सूचना प्रसिद्ध
15 ते 21 जून-हरकती व सूचना मागविणे 24 जूनपर्यंत-आरक्षण सोडतीचा अहवाल पाठविणे 29 जून-नगर परिषद सदस्य पदाच्या आरक्षणास मान्यता देणे 1 जुलै-सदस्य पदाच्या आरक्षणाची माहिती प्रसिद्ध करणे.
सोमवार 13 जून ला कामठी नगर परिषद च्या 17 प्रभागाचे आरक्षण सोडत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com