संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मेट्रो-2 ला केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे आता ऑटोमैटिक चौक ते कन्हान पर्यंत मेट्रो लवकरात लवकर लोकांच्या सेवेकरिता उपलब्ध करावे तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलची प्रतिकृति असलेले ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन उभारण्यात यावे या विषयावर अँड. सुलेखा कुंभारे यांनी मेट्रोचे महाप्रबंधक ब्रिजेश दिक्षीत यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दिक्षा भुमी समोरील मेट्रो कार्यालयात घेण्यात आली.
उल्लेखनीय आहे की 2018 मध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रतिकृतिचे मेट्रो स्टेशन उभारण्यात येईल अशी घोषणा केली होती.
आता केंद्र सरकारने मेट्रो-2 ला, मंजुरी दिल्यामुळे कामठी येथे होणा-या मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. लवतरच या ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन चे भुमी पुजन होवून मेट्रोच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. अशी माहाती ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अँड सुलेखा कुंभारे यांनी पत्रकाद्वारे दिली.