पटोले यांच्या हस्ते Needly sos महिला सुरक्षा पर्सनल सेफ्टी ॲपचे लोकार्पण

नागपूर :- महिला सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा आणि बाल सुरक्षा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा विषय बनलेला आहे. त्या संदर्भात आत्मसुरक्षेसाठी सर्वांच्या मोबाईलमध्ये सर्वोत्तम ॲप असणे आवश्यक झाले आहे.यापार्श्वभूमीवर ‘स्वयम्’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल विलास मुत्तेमवार यांच्या पुढाकाराने Needly sos महिला सुरक्षा पर्सनल सेफ्टी ॲप उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे व वरिष्ठ नेते हुकुमचंद अमधारे सुद्धा उपस्थित होते.

Needly sos हे ॲप निःशुल्क असून महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. समाजात महिलांच्या, विशेषत: विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तातडीने संरक्षण न मिळाल्याने महिलांवरील गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

ही ज्वलंत समस्या लक्षात घेऊन ‘स्वयम्’ सामाजिक संस्थेने महिला आणि मुलांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी एक अतिशय प्रभावी मोबाइल ॲप विकसित केले आहे, ज्याला Needly sos नाव देण्यात आले आहे. हे ॲप पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्याअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या आवश्यक सहाय्य सेवा देखील प्रभावी आणि विनामूल्य आहेत. हा ॲप डाऊनलोड करण्यासाठी 07127191232 या क्रमांकावर मिसड् कॉल द्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री संत गजानन महाराज पायी पालखी सोहळा २० ला 

Fri Oct 18 , 2024
कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील श्री गजानन भजन पारायण मंडळ तथा भक्त परिवार तर्फे श्री च्या पायी पालखी सोहळा रविवार दिनांक 20 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे .श्री राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई सार्वजनिक देवस्थान येथून सकाळी ठीक सहा वाजता आरती व ठीक सात वाजता पालखी प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पायी पालखी जाण्याच्या मार्ग भांडेवाडी -अरोली- खापरखेडा -पारडी -निमखेडा मार्गे श्री संत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com