पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024

नवी दिल्ली :- दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील

पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार, औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक, वंश, व्यवसाय, स्तर, किंवा लिंगाचा अपवाद न करता, या पुरस्कारांसाठी पात्र आहे.

सरकार सर्व नागरिकांना स्वत:चे नामांकन करण्यासाठी आणि इतर योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन करत आहे, विशेषत: स्त्रिया, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग, आणि निस्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नामांकने सादर करताना, व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती 800 शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक असल्याचे गृह मंत्रालयाने त्यांच्या बातमी पत्रात म्हटले आहे. यासंबंधी अधिक माहिती गृहमंत्रालयाच्या (https://mha.gov.in) संकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

11 लाख 'लखपती दीदींना' पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र

Fri Aug 23 , 2024
– 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com