सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार तथा सफाई कामगार यांना पोलीस आयुक्त यांनी दिला भावपुर्ण निरोप

नागपुर :- पोलीस आयुक्त नागपुर शहर हे दिनांक २९.०२.२०२४ चे १७. ३० वा. नागपुर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित पोलीस भवन येथील ऑडीटोरीयम हॉल येथे सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार तथा सफाई कामगार यांचे निरोप समारंभ कार्यकमाकरीता स्वतः आवर्जुन उपस्थित राहीले. सेवानिवृत्त होणारे १३ अधिकारी आणि अंमलदार तसेच सफाई कामगार यांना सह पत्नी परीवारासह पोलीस आयुक्त यांनी भावपुर्ण निरोप दिला.

याक्षणी पोलीस आयुक्त यांनी सर्व सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवुन त्यांनी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सदृढ राहावे तसेच, सेवानिवृत्तीचा मिळणारा आर्थिक लाभांश काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचा मोलाचा सल्ला दिला.

पोलीस आयुक्त यांनी स्वतः निरोप समारंभ कार्यक्रमाकरीता उपस्थित राहून घेतलेली दखल व त्यांच्या हस्ते मिळालेले स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र हा एक आठवणीचा क्षण त्यांच्या या निरोप समारंभात राहीला. अशाप्रकारची भावना सर्व सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदार तथा सफाई कामगार यांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्तालयातील निरोप समारंभात होणान्या या बदलाबाबत सर्वांनी पोलीस आयुक्त यांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

७२ वी अखिल भारतीय पोलीस वॉलिबॉल क्लस्टर स्पर्धेचे उद्‌द्घाटन

Fri Mar 1 , 2024
नागपूर :- ७२ व्या अखिल भारतीय पोलीस वॉलिबॉल क्लस्टर स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा दि. २९.०२.२०२४ रोजी दुपारी ०४.०० वा. नागपूर शहर पोलीस मुख्यालय येथील शिवाजी स्टेडियमवर थाटामाटात पार पडला, या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या महणून महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक   रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. कार्यक्रमास उपस्थितांमध्ये  पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्र कुमार सिंगल,आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग शिरीश जैन, सह पोलीस आयुक्त, नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights