मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

-विविध योजनांच्या माध्यमातून हातभार लावा

-सौर पंपाच्या अटी -शर्थी बाबत पुनर्विचार करणार

        नागपूर : नागपूर ग्रामीण भागात झालेल्या गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संवेदनशीलतेने मदत करा. राज्य शासनाच्या विविध योजनेतून त्यांना मदत मिळेल, असे नियोजन करा. पंचनामे पुढील दोन दिवसात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे उर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

       नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, नागपूर ग्रामीण या भागात पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दौरा केला. तर आजच पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी रामटेक तालुक्यामध्ये दौरा केला. या दौऱ्यावरून परत आल्यानंतर डॉ.नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाभरातील पंचनामे, पिक विमा नुकसान तसेच वीज कंपन्यांकडून झालेले सर्वेक्षण याबाबतचा आढावा घेतला.

       या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, विद्युत कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

      नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दौरा करताना सौर पंप संदर्भातील अटीशर्तीमुळे काही ठिकाणी पाण्याचा उपसा संदर्भात शेतकऱ्यांना अडचण जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वीज पंपाच्या क्षमतेसंदर्भात या भागातील अटी-शर्ती शिथिल करता येतील का या संदर्भात अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

     नुकसान भरपाई देताना कोणाचे नुकसान होणार नाही. मात्र चुकीचे लोकही यादीत येणार नाही, यासाठी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर यादी लावण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

    पीक विमा काढलेला आहे व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी तात्काळ पिक विमा कंपन्यांकडे व कृषी विभागाकडे अर्ज करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सर्वांना सूचना पाठवण्याचे त्यांनी निर्देशित केले.

     पारशिवनी परिसरातील पंचनामे प्रलंबित असल्याचे लक्षात आले. पुढील दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण झाले पाहिजे अशी कालमर्यादा त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

रामटेक तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द - सुनील केदार

Mon Jan 17 , 2022
-चार कोटी साडेआठ लाख रुपये कामांचे भूमीपूजन नागपूर : रामटेक तालुका आदिवासी बहुल असून कोवीड महामारीमुळे तालुक्यातील विकास कामांना खंड पडला होता. आता त्यांना गती देऊन विकासाची गंगा आणण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. त्यासोबतच शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायास चालना देण्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com