जुगार
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत दक्षिणेस १ कि मी अंतरावर सत्रापुर येथील पंप हाऊस चा मैदानाजवळ जुगार खेळतांनी ५ आरोपी मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी नगदी १८०० व ५२ ताश पत्ते ताब्यात घेऊन पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपा सात घेतले आहे.
           प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१४) मे ला सायंकाळी ६:३० ते ७ वाजता दरम्यान सत्रापुर येथील पंप हाऊस चा मैदानाजवळ जुगार खेळताना आरोपी १) विनित क्रिष्णा पात्रे, २) अनिकेत विरेंद्र खडसे, ३) मोनिष दामु पात्रे, ४) अर्जुन बेलसिंग पात्रे सर्व राह.  सत्रापुर कन्हान व ५) धर्मेंद्र अरविंद सोराते राह. यादव मोहल्ला कन्हान हे सार्वजनिक ठिकाणी ताश पत्यावर पैश्याच्या हारजीतचा जुगार खेळताना मिळुन आल्याने जप्ती प्रमाणे नगदी १८०० रूपये व ५२ ताश पत्ते चा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी नदिन शांताराम पाटील यांच्या तक्रारी वरून पाच आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ तहत कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला असुन सदर आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करते वेळी न्यायालयात हजर राहाण्याच्या अटीवर सुचना पत्र देऊन सोडण्यात आले आहे.
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com