बसपाच्या कार्यकर्त्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 30 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी चौक स्थित उत्थान नागरी सहकारी पत संस्थेत कारकून पदावर कार्यरत असलेल्या बहुजन समाज पार्टी चे माजी पदाधिकारी व कार्यकर्ताने विश्वासघात करून 1 लक्ष 53 हजार 49 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी संस्थेचे मॅनेजर शशिकांत सहादेव नारनवरे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मनोज रंगारी वय 52 वर्षे रा कामगार नगर कामठी विरुद्ध भादबी कलम 420,408 अनव्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधी चौक स्थित साबळे कॉम्प्लेक्स मध्ये उत्थान नागरी सहकारी पत संस्था कार्यालय काही वर्षांपूर्वी उघडले असता या कार्यलयात सदर पत संस्थेच्या वतीने आरोपी मनोज रंगारी ला कारकून पदावर नियुक्त केले असता आरोपीने 28 औकटोबर 2006 ते 12 जून 2012 या कालावधीत खातेदाराच्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी 1 लक्ष 53 हजार 49 रुपयांचा वापर करून विश्वासघात केला.यासंदर्भात आरोपी मनोज रंगारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Sat Oct 1 , 2022
मुंबई :-  सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com