सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १० हजाराचा दंड वसूल, स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.६) रोजी ७ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे देव नगर चौक स्थित स्वास्थ्यम हॉस्पिटल यांच्यावर रस्त्यालगत कचरा पसरविल्या प्रकरणी कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत धंतोली येथील यशवंत स्टेडियम जवळ असणाऱ्या फास्ट फूड कॉर्नर यांच्यावर सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तर लॉ कॉलेज चौक येथील स्टेप इन रेस्टोरंट यांच्यावर कचरा शुल्क न भरणे व रस्त्यालगत कचरा पसरविल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोन अंतर्गत वर्धा रोड स्थित चिंचभवन चौक येथील पंकज रेस्टोरंट यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी १० हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत तींनल चौक येथील भास्कर किराणा स्टोअर्स यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत राणी दुर्गावती चौक येथील वाकोडीया क्लॉथ स्टोअर्स यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत डिप्टी सिंग्नल चौक येथील राजू सिंग यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिरपूर गावातून 35 हजार रुपये किमतीच्या मशीन चोरीला

Tue Jun 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर गावातून फिर्यादीने आपल्या घरासमोर शेताला पाणी देण्याकरिता लागणाऱ्या अशोका कंपनीची 05 हॉर्स ची सर्म सिम्बल मशीन व एक पावर साधी मशीन असा एकूण 35 हजार रुपये किमतीचे मशीन चोरीला गेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी मारोती वानखेडे वय 50 वर्षे रा शिरपूर तालुका कामठी ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com