हरदास नगरात दिवसाढवळ्या वृद्ध महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथे मोलमजुरी करून घरी परत येत असलेल्या 60 वर्षीय रेखा बोरकर नामक महिलेची दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना मागील महिन्यात 21 एप्रिल ला घडली असता यातील आरोपीचा शोध घेण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या घटनेला विराम मिळत नाही तोच या घटनास्थळाच्या कडेला असलेल्या हरदास नगर येथे चहांदे कुटुंबात लग्न कार्यक्रमात सहभागी व्हायला आलेल्या एका 74 वर्षोय वृद्ध महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी एका 25 वर्षीय अज्ञात तरुणाने हिसकावून पळ काढल्याची घटना घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी 74 वर्षीय महिला शोभा गणवीर रा वरठी भंडारा ने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! - पालघर येथील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुनरुच्चार

Tue May 14 , 2024
पालघर :- पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला. पालघर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेस, इंडी आघाडी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com