कामठीत नो हॉकिंग अभियान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अनावश्यक हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनिप्रदूषण होते त्याचा मानवी आरोग्यावरही परिणाम होतो त्यामुळे अनावश्यक हॉर्न वाजविने टाळावे,वाहतूक नियम पाळावे,हेल्मेट चा वापर करावे ,सिट बेल्ट चा वापर करावे असा संदेश नागरिकांना देत पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी वाहतूक पोलीस निरीक्षक पतंगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मुख्य उपस्थितीत पोलीस लाईन चौकात कामठीत नो हॉकिंग अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून गरज नसताना हॉर्नचा वापर करू नये,असे आवाहन केले तसेच विविध प्रकारचे संदेश देणारे फलक दाखवून वाहन चालकांचे लक्ष वेधण्यात आले.अनेक युवक कारण नसताना हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करतात. विनाकारन हॉर्न वाजविल्यामुळे शाळा,महाविद्यालये,रुग्णांना व इतर वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास होतो त्यामुळे इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने हॉर्न वाजवू नये असा संदेश अभियानातून देण्यात आला.तसेच कामठी पोलीस लाईन चैकासह जयस्तंभ चौक,मोटर स्टँड चौक आदी चौकात नो हॉकिंग अभियानातून पोलिसांनी हॉर्न फ्री कामठी चा संदेश दिला.

या अभियानात वाहतुक पोलीस निरीक्षक पतंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, अखिलेश ठाकुर, वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिडीवरून नाल्यात पडलेल्या इसमाचा मृत्यु

Sat May 25 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बी बी कॉलोनी येथे भाड्याच्या घरात राहनाऱ्या एका इसमाने दारुच्या नशेत बेधुंद अवस्थेत शिडीवर चढले असता सदर इसमाचा तोल जाऊन कडेला असलेल्या नाल्यात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सदर इसमाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना गतरात्री घडली असून मृतकाचे नाव रेखालाल मंडलवार वय 45 वर्षे रा बी बी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com