संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बी बी कॉलोनी येथे भाड्याच्या घरात राहनाऱ्या एका इसमाने दारुच्या नशेत बेधुंद अवस्थेत शिडीवर चढले असता सदर इसमाचा तोल जाऊन कडेला असलेल्या नाल्यात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सदर इसमाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना गतरात्री घडली असून मृतकाचे नाव रेखालाल मंडलवार वय 45 वर्षे रा बी बी कोलोनी कामठी असे आहे.पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.