मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी कामठीत अंगणवाडी केंद्र व मदत केंद्र सुसज्ज

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यासाठी कामठी नगर परिषद ला 17 हजार 500 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून या उद्दिष्टपूर्तीसह कुठलेही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचीत राहू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याची भूमीका घेतली असून पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन,ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कामठी शहरांतर्गत येणाऱ्या 91 अंगणवाडी सह मदत केंद्र, उभारण्यात आले असून या अंगणवाडी व मदत केंद्रातून लाभार्थ्यांना अर्ज भरण्याची मोफत सोय केल्या जात आहे.त्यानुसार प्रभाग क्र 14 येथील अंगणवाडी केंद्र क्र 71 येथे तसेच मदत केंद्रात अंगणवाडी सेविका सुषमा सुरेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोफत भरण्यात येत आहेत .दररोज 100 अर्जाची पूर्तता करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

-कामात हलगर्जीपणा केल्यास होणार कार्यवाही

-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात कामठी नगर परिषद कार्यालयात स्वतंत्र कक्षासह अंगणवाडी केंद्र तसेच मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.या कामात कोणीही हयगय,टाळाटाळ व दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल असा ईशारा मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वैष्णवी क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी मर्यादित कान्द्री-कन्हान यांची पंचवार्षिक निवडणूक संपन्न

Tue Jul 16 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वैष्णवी क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी मर्यादित कान्द्री-कन्हान यांचा दि.1/7/24 रोजी संपन्न झालेल्या पंच वार्षिक निवळनुकीत नीलकंठ मस्के यांचा नेतृत्वात नव्याने संपूर्ण संचालक मंडल निवळून आले. त्या मधे निलकंठ मस्के,अशोक आष्टणकर,विनोद किरपान,शैलेश शेळके, रिंकेश चवरे, सुरेश पारधी, सुरेश जसुतकर,श्याम बावनकुळे,अशोक चांभारे,प्रगती बावनकुळेरीना भुरे यांची बिन विरोध निवड करण्यात आली त्याच प्रमाणे दि.15/7/24 ला नवनिर्वाचित संचालक मंडलाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com