निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

मुंबई :- कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई – ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भालेराव महाविद्यालयात विज्ञान दिवस साजरा...

Thu Feb 29 , 2024
सावनेर :-  स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथील बी. एस सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या नोबेल पुरस्कार मिळालेल्या “रमण इफेक्ट” या शोधाच्या निमित्याने २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. केंद्र शासनातर्फे यासाठी “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” अशी संकल्पना देण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights